News

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील जवळपास २९.५० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार ९८० कोटी रुपये जमा करून कर्जमुक्त केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली.

Updated on 17 August, 2020 3:28 PM IST


मुंबई -  महाराष्ट्र सरकारने राज्यातील जवळपास २९.५० लाख  शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात १८ हजार ९८० कोटी रुपये जमा करून कर्जमुक्त केल्याची  माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. दक्षिण मुंबईतील मंत्रालयात (राज्य सचिवालय) ठाकरे बोलत होते. सतर्कतेने" तसेच  महाराष्ट्रात कोविड -१९  चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढवल्याचेही त्यांनी नमूद केले. कोविड -१९ च्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा शाळा उघडता येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.  परंतु गुगल क्लासरूमच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते हे पाहण्यासाठी सरकारने पावले उचलली.

"देशात असे पाऊल उचलणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले आहे." सरकार शेतकरी व कामगार वर्गावर लक्ष केंद्रित करेल कारण ते महाराष्ट्राचे कल्याणकारी(welfare state) राज्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीविषयी माहिती दिली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सुमारे १८ हजार ९८० कोटी  रुपये बँक खात्यात जमा करुन  २९.५०  लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले गेले आहे. 

लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ऑनलाईन कर्ज माफी योजना २०२० अंतर्गत सरकारी नोकरी कामगार किंवा उत्पन्न कर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही .ऊस आणि फळांसह अन्य पारंपारिक शेती करणारे राज्यातील शेतकरीही या योजनेंतर्गत येतील.  सरकारनेही ४१८.८ क्विंटल कापूस खरेदी केली, जी गेल्या १० वर्षात सर्वाधिक आहे. स्थानिक, मराठी लोकांना रोजगार मिळावा यासाठी सरकारने “महाजॉब्स” पोर्टलही सुरू केला आहे असे ते म्हणाले .
  

English Summary: 29.50 lakh farmers debt relief by Maharashtra government – Cm
Published on: 17 August 2020, 03:27 IST