News

बियाणे आणि शेतकरी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. चांगले बियाणे शेतीत लागवड केल्यानंतर येणारे उत्पादन देखील दर्जेदार मिळते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होतो.

Updated on 07 June, 2022 11:24 AM IST

बियाणे आणि शेतकरी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. चांगले बियाणे शेतीत लागवड केल्यानंतर येणारे उत्पादन देखील दर्जेदार मिळते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होतो.

परंतु शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे असलेले बियाणे जर सदोष निघाले तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान तर होतेच परंतु पूर्ण हंगाम वाया जातो. विविध पिकांच्या बियाण्यांची निर्मिती कंपन्यांमार्फत केली जाते. परंतु बरेच प्रकारचे बियाणे हे दर्जेदार न निघता सदोष निघते व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नुकसान होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून उभारलेला बियाणे महोत्सव शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आणि वरदान ठरला. बियाणे  महोत्सवामध्ये तब्बल 29 कोटी रुपयांची उलाढाल झाली.

परंतु या बियाणे महोत्सवाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते 29 कोटी रुपये बियाणे कंपन्यांच्या खिशात जाणारे होते परंतु ते या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरात गेले.

नक्की वाचा:Durum Wheat: भारतातील हा गहू आहे जगात प्रसिद्ध, यापासून जगात बनतात पास्ता, नूडल्स आणि मॅक्रोनी

 नेमके काय होती या बियाणे महोत्सवाची संकल्पना?

 आता आपल्याला माहित आहेच की संपूर्ण राज्यात आणि अकोला जिल्ह्यात देखील अनेक खाजगी कंपन्या सोबतच महाबीज या कंपनीच्या बियाण्यांचा देखील तुटवडा आहे.

बियाण्यांच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना या बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांचे पीक बियाणे म्हणून विकण्यात आले. या बियाणे महोत्सवात तब्बल 21 हजार सतरा क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून त्यातील तब्बल दहा हजार 173 क्विंटल बियाणे विकले गेले असून त्या माध्यमातून 29 कोटी 13 लाख 52 हजार रुपयांची उलाढाल झाली.

एवढी रक्कम ही बियाणे कंपनीच्या घशात गेली असती परंतुहा पैसा थेट शेतकऱ्यांच्या घरात गेल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला आहे.

नक्की वाचा:बियाणे उगवण क्षमता तपासण्याची सोप्पी पद्धत पाहाच कृषी विद्यार्थ्यांकडून हे मोलाचं मार्गदर्शन

त्यातील महत्त्वाचे दुसरी गोष्ट म्हणजे, शेतकऱ्यांना या बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून जे काही बियाणे मिळाले ते उत्कृष्ट आणि शेतकऱ्यांना जे हवे होते ते मिळाल्याने अकोला बियाणे महोत्सव खाऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी फायद्याचा वरदानदायी ठरला आहे.

या अकोला बियाणे महोत्सवाच्या यशानंतर पुढील वर्षात यापेक्षाही मोठा याने महोत्सव घेऊन तो राज्य स्तरावर राबविण्यात येईल अशी ग्वाही अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली. बियाण्याचा तुटवडा, सदोष बियाणे आणि महागाई यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकारचा खूप मोठा दिलासा या महोत्सवाच्या निमित्ताने मिळाला आहे.

नक्की वाचा:Mansoon Rain: अरे बापरे! महाराष्ट्रात मान्सून आगमन लांबल, 'या' तारखेला बरसणार मान्सूनचा पहिला पाऊस

English Summary: 29 crore rupees benifit to farmer from seed selling in akola seed festivel
Published on: 07 June 2022, 11:24 IST