News

शेती म्हटले म्हणजे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळे आणि या सगळ्यामुळे आलेली नापिकी या सगळ्यांचा ससेमिरा आता शेतकऱ्यांच्या पाठीमागेही सतत असतो.

Updated on 20 February, 2022 9:11 AM IST

शेती म्हटले म्हणजे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळे आणि या सगळ्यामुळे आलेली  नापिकी या सगळ्यांचा ससेमिरा आता शेतकऱ्यांच्या पाठीमागेही सतत असतो. शेती म्हटले म्हणजे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळे आणि या सगळ्यामुळे आलेली  नापिकी या सगळ्यांचा ससेमिरा आता शेतकऱ्यांच्या पाठीमागेही सतत असतो. 

त्यामुळे शेतकरी राजांनी शेतीसाठी घेतलेले कर्जाचा बोजा हा वाढतच जातो. त्यामुळे बऱ्याचदा आत्महत्येसारखा टोकाचेपाऊल उचलले जाते. अशा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये घरातील कर्ती व्यक्ती चालले गेल्याने कुटुंबाकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहतो. इतकेच नाही तर अक्षरशः कुटुंबातील मुलांचे शिक्षण देखील अपूर्ण राहण्याची शक्यता असते.

कुटुंबातील मुलांना अगदी लहान वयामध्ये रोजगार शोधायची वेळ येते. त्यामुळे अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लोकांना मदतीचा आधार मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सर्वेक्षण करून त्यांना कोणत्या योजनेतून शासकीय मदत दिली जाईल जेणेकरून त्यांच्यात उभारी येईल? यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने  कंबर कसली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 268 कुटुंबियांना प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून देणे सोबतच विविध 1723 प्रकारचे लाभ देत उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.

या उपक्रमांमध्ये सामाजिक संस्थानी देखील प्रशासनाला मदत करत या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. यामध्ये मागच्या सात वर्षात झालेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध 1723 प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात आला.

English Summary: 268 family of suside farmer give veriety of help by nashik administration
Published on: 20 February 2022, 09:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)