बांगलादेशने परत एकदा आयात शुल्कात तब्बल २५ रुपयांची वाढ केली आहे. पूर्वीच्या ६३ रुपयांवर आता प्रतिकिलो ८८ रुपयांची आकारणी केली जाईल. यामुळे याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याचा संत्रा निर्यातीवर मोठा परिणाम होईल. याआधी बांगलादेशला दीड लाख टन संत्रा निर्यात होत होती. शुल्क वाढीच्या परिणामी ती निम्म्यावर आली असताना आता त्यात पुन्हा घट होण्याची भीती आहे.
दरम्यान, बांगलादेश सातत्याने नियमाचा भंग करून संत्रा उत्पादकांना वेठीस धरत असल्याचा आरोप संत्रा बागायतदार संघाकडून केला जात आहे. २०१९ मध्ये २० रुपये, २०२० मध्ये ३०, २०२१ साली ५१ तर नोव्हेंबर २०२२ मध्ये ६३ रुपये अशी प्रतिकिलो आयात शुल्कात वाढ करण्यात आली.
असे असताना आता पुन्हा एकदा आयात शुल्क तब्बल २५ रुपयांनी वाढवून ८८ रुपये करण्यात आले आहे. बांगलादेशचे व्यापारी थेट भारतात येऊन स्थानिक व्यापारी, अडत्यांच्या माध्यमातून सौदे करतात. पश्चिम बंगाल मार्गे रस्ते मार्गाने थेट बांगलादेशला निर्यात केली जाते.
अखेर राज्यात पावसाला सुरुवात, 'या’ ठिकाणी आज पडणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी…
सार्क देशातील व्यवहारासंबंधीच्या अटी-शर्तीत देखील एकमेकांकडून कोणतेही शुल्क न आकारण्याचे ठरले आहे. मात्र याकडे या देशाने लक्ष दिले नाही.
गायींच्या या तीन जाती संभाळल्यास करोडपती व्हाल,रोज देऊ शकतात 50 लिटरहून अधिक दूध
शेतकऱ्यांनो अशा प्रकारे करा सीताफळ बहराची तयारी
उंदरापासून पिकांचा बचाव करण्याचे पर्यावरणपूरक तंत्र, शेतकऱ्यांनो जाणून घ्या...
Published on: 13 June 2023, 10:05 IST