महाराष्ट्रात ह्यावर्षी शेतकरी अनेक संकटाना सामोरे जात आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र येथील शेतमालाला मोठा फटका बसला आहे. आपले सोन्यासारखे पिक पावसामुळे नष्ट होताना शेतकऱ्याने आपल्या डोळ्यासमोर पाहिले आहे, हे दुःख शेतकरी पचवायला समर्थ नाही ह्याचाच परिणाम म्हणुन ह्यावर्षी महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.
NCRB च्या एका अहवालनुसार भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना 18 टक्क्यानी वाढल्या आहेत आणि हि एक चिंतेची बाब आहे. तसेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या हा आकडा सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या जास्त होत आहेत, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. बीड जिल्ह्यात फक्त एका महिन्यात जवळपास 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. आणि हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकरी नेत्यांचे ह्यावर म्हणणे आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, आणि ह्याचा मानसिक धक्का शेतकऱ्यांना बसला आहे. दुसरीकडे सरकार दावा करत आहे की, अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे, निरीक्षण करण्यात आले आहेत आणि नुकसान भरपाई हि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे चालू आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची निधी मागेच मंजूर केली आहे.
या सर्व प्रकरणात शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, जर सरकार विचार करत असेल की, पैशांनी शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई भरून निघेल तर सरकार चुकीचा विचार करत आहे, असे बिलकुल नाही आहे. पैशांनी पिकांची नुकसान भरपाई भरून निघेल पण शेतकऱ्यांना जो मानसिक धक्का बसला आहे आणि त्यामुळे तो आत्महत्या करतोय ह्यावर सरकार काय करणार.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दहा महिन्यात 158 शेतकऱ्यांनी सोडले आपले प्राण
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यांत शेतकरी आत्महत्यांच्या संख्या एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, शेतीसाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होत नाहीय शिवाय अतिवृष्टीनंतर सरकारने कोणतेही नियोजन केलेले दिसत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मजबूर होत असल्याचे चित्र दिसत आहे. ह्यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा धडकी भरवतो आहे.
बीड जिल्ह्यात ह्या दहा महिन्यात 158 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या या आत्महत्यांबाबतच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून आले आहे की शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी ह्या वाढतच आहेत आणि त्यामुळे हा एक मोठा विषय आहे आणि यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Published on: 02 November 2021, 05:37 IST