News

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आणि त्यात अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांना लागोपाठ एक एक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेती म्हणजे शेतकऱ्यांपुढे एक प्रकारचे आव्हानच तयार झाले आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर ते अनेक कल्पना वापरून उत्पादन काढू शकतात हे उपळाई बुद्रुक तालुका माढा मधील शेतकरी संतोष जाधव यांनी करून दाखवले आहे. संतोष जाधव यांनी अवघ्या अडीच एकरमध्ये २४१ टन उसाचे उत्पादन काढले आहे.

Updated on 20 December, 2021 6:29 PM IST

उपळाई बुद्रुक म्हणले की हा एक प्रकारचा दुष्काळी भाग मात्र मागील २-३ वर्षांपासून सीना-माढा उपसा सिंचन या योजनेमधून तिथे पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे तेथील शेतकरी आता आपला कल ऊस लागवड तसेच बागायत शेतीकडे ओळवला आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी म्हणजे संतोष जाधव. उपळाई मध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने दीड वर्षांपूर्वी पहिल्यांदाच शेतीची मशागत करून उसाची लागवड करण्याचे नियोजन केले. संतोष जाधव यांनी ऊस बेणे गोल्डन ८६०३२ या जातीची लागवड केली. उसाची उगवण झाल्यानंतर २०-२५ दिवसांनी त्यांनी रासायनिक खताचा त्यास पहिला डोस दिला.

संतोष जाधव यांनी स्वतःची कल्पना आणि नियोजन केले त्यामुळे उसावर कोणत्याही प्रकारची कीड, माशी,पांढरी माशी तसेच कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यांनी पहिल्यांदा रासायनिक खताचा वापर केला व नंतर कोंबडी खत वापरले. त्यांनी लावलेल्या उसाच्या एका बुडाला सुमारे २२ फुटवे होऊन ५० काड्यांचा ऊस निघाला आहे. एका उसाचे वजन जवळपास नऊ किलोकडे जाते. त्यांना अडीच एकर ऊस लागवडीला सुमारे १ लाख रुपये एवढा खर्च आला. एकरी १०० टन एवढे उत्पन्न त्यांनी काढले आहे.

अडीच एकरात २४१ टन एवढे उत्पन्न संतोष जाधव यांनी काढले आहे. उसाची देखभाल फक्त संतोष जाधव यांनी नाही तर त्यांची मुले तसेच पत्नी यांनी देखील केली आहे. कारखान्याचा भाव धरला तर त्यांना ६ लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न भेटले आहे. संतोष जाधव सांगतात की पहिल्यांदाच उसाची लागवड केली होती जे की यासाठी पाहिण्याचे सुद्धा मार्गदर्शन भेटले. उत्पन्न चांगले भेटल्याने कुटुंबाने जे कष्ट केले त्याचे चीज झाले.

English Summary: 241 tons of sugarcane grown in an area of ​​2.5 acres, read more
Published on: 20 December 2021, 06:29 IST