News

कोरोना (corona virus) मुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात बाजार समित्यांच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या आदेशामुळे काही बाजार समित्या बंद आहेत. तर काही ठिकाणी अडते, कामगार संघटनांच्या आडमुठेपणामुळे बंद आहेत.

Updated on 18 April, 2020 11:04 AM IST


कोरोना (Corona virus)  मुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात बाजार समित्यांच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या आदेशामुळे काही बाजार समित्या बंद आहेत. तर काही ठिकाणी अडते., कामगार संघटनांच्या आडमुठेपणामुळे बंद आहेत. मात्र आता स्थानिक पोलिस, महसूल आणि बाजार समिती प्रशासनाने समन्वयाने बाजार समित्या सुरू करण्याच्या भूमिकेमुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांपैकी २३९ समित्या सुरू असून ३६ बंद असल्याचे पणन संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याविषयीचे वृत्त एग्रोवन ने दिले आहे. 

लॉकडाऊनमध्ये सामाजिक अंतरासह विविध उपाययोजना आणि खबरदारी घेण्याच्या सूचनांसह बाजार समित्या सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक पोलिस, महसूल प्रशासनाच्या विसंवादामुळे आणि वेगवेगळ्या आदेशांमुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कोणताही पर्याय न देता  बाजार समित्या बंद ठेवल्यामुळे शेतमालाचा उठाव थांबल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर शहारांमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा झाल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला खरेजी करावा लागत आहे.

मात्र लॉकडाऊनमध्ये शहरातील नागरिकांना भाजीपाला मिळत नसल्याने होत असलेल्या कोंडीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. तर शेतकऱ्यांच्या देखील दबाव वाढल्याने अखेर बाजार समित्या टप्प्याटप्याने सुरू होऊ लागल्या आहेत.  राज्यातील मह्त्वाच्या असलेल्या मुंबई आणि पुणे बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत होत आहेत. पुणे बाजार समितीचे मुख्य आवार हॉटस्पॉटमुळे बंद असून ४ उपबाजार आजपासून सुरू झाले आहेत.  चार उपबाजारांमध्ये २४८ बाहनांमधून सुमारे साडेपाच हजार क्विंकट भाजीपाल्याची आवक झाली होती.

English Summary: 239 agriculture produce market committees are start , 36 closed down
Published on: 18 April 2020, 11:02 IST