News

मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या २,३३४ झाली आहे. कोरोनाबाधित २२९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १,९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Updated on 14 April, 2020 7:28 AM IST


मुंबई:
राज्यात आज कोरोनाच्या ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या २,३३४ झाली आहे. कोरोनाबाधित २२९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १,९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३ हजार १९९ नमुन्यांपैकी ३९ हजार ८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात ११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ४ पुरुष तर ७ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ८ रुग्णांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६० झाली आहे. आज राज्यातून २२९ कोविड १९ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

English Summary: 229 corona affected patients recover and send it home
Published on: 14 April 2020, 07:26 IST