मराठवाड्यातील 200 तरुण शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या मदतीने शास्त्रीय पद्धतीने ऊस उत्पादन तंत्राचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय वेस्ट इंडियन शुगर मिल्स अर्थात विस्मा व नॅचरल शुगर ने घेतला आहे.
अशा आशयाची घोषणा वेस्ट इंडियन शुगर मिल्स चे अध्यक्ष व नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक बी.बी ठोंबरे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या परिसंवादात केली.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.
. या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रशिक्षणाचा 50 टक्के खर्च हा नॅचरल शुगर उचलणार आहे व उर्वरित शुल्क शेतकऱ्यांना द्यायचे आहे. या परिसंवादात राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. धर्मेंद्र फाळके यांनी उसाचे पाचट काळ्याआईचे खाद्य असल्याने ते जाळूनका अशा प्रकारचे आवाहन केले. जर जमिनीचा पोत सुधारण्याचा असेल तर पाचटाची कुट्टी न करता ती हळूहळूकुजवावी. ऊसात आच्छादन म्हणून वापरावे व खोडव्यात द्विदल आंतरपिके घ्यावीत.
Published on: 14 January 2022, 06:44 IST