अवकाळी पावसामुळे राज्यातील २० हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अद्याप पंचनाम्याला सुरू झाली नसल्याने नुकसानीचा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.
कृषी खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामातील गहू, व हरभरा ही दोन्ही पिके काढणीच्या अवस्थेत असताना काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळासह अवकाळी पाऊस झाला. बुधवार व गुरुवारी झालेल्या या पावसामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय बुलडाणा,नागपूर, धुळे , नाशिक, औरंगाबाद पट्ट्यातही नुकसान झाले आहे. गहू, हरभऱ्यासहित भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, आंबे अशा फळपिकांची हानी झाली आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी काही नुकसानग्रस्त गावांना तातडीने भेट देत शेतकऱ्यांना धीर दिला आहे. नुकसानग्रस्त पंचनाम्याशिवाय भरपाई मिळत नाही. त्यामुळे असे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कृषी मंत्र्यांनी जाहीर केले. पण शनिवारी दुपारपर्यंत तरी कोणत्याही जिल्ह्यात पंचनाम्याचे आदेश पोचले नव्हते.
पंचनाम्याचे आदेश जारी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची नाही. मदत व पुनर्वसन विभागाकडून आदेश काढल्यानंतर महसूल विभागाच्या अखात्यारित पंचनाम्याचे आदेश पोचले नव्हते. पंचनाम्याचे आदेश जारी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची नाही. मदत व पुनर्वसन विभागाकडून आदेश काढल्यानंतर महसूल विभागाच्या अखात्यारित पंचनाम्याची प्रक्रिया होते. त्यासाठी कृषी विभाग केवळ सहाय्य करतो. मात्र अंतिम अहवाल महसूल विभागाकडून थेट राज्य शासनाला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात गेल्या वर्षी हंगामात अवकाळी पावसामुळे अतोनात हानी झाली होती. ४१ लाख हेक्टररील खरीप पिके नष्ट झाल्यानंतर शेतकरी स्वत:हून सावरले होते. मधल्या काळात कीड -रोगामुळे पुन्हा जवळपास सव्वा लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली. मात्र शेतकरी या संकटांमधून सावरत रब्बीकडे वळाला होता. ऐन रब्बी पिके काढणीत अवकाळी पावसाने कहर केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अवकाळी पाऊस-गारपीट आणि वादळ या तिन्ही कारणांमुळे विविध भागांमध्ये किमान ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांची हानी झाल्याचा आहे.
बदलत्या वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या आंबा बागायतदारांना चार दिवसांपुर्वी पडलेल्या गारांच्या पावसाने दणका दिला.रत्नागिरी तालुक्यातील करबुडे,वेतोशीही, जाकादेवी परिसरातील सुपारीएवढ्या गार पडल्या, त्यामुळे कैरीवर डाग पडलेले आहेत.
Published on: 22 February 2021, 10:43 IST