News

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकणी अवकाळी पाऊस पडला, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना आता दिल्ली सरकारने या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति एकर दराने सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.

Updated on 30 January, 2022 7:00 AM IST

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकणी अवकाळी पाऊस पडला, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना आता दिल्ली सरकारने या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति एकर दराने सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. यामुळे आता महाराष्ट्रात हा निर्णय होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे अनेकांची पिके हातातून गेली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानीच्या मूल्यांकनानुसार शेतकर्‍यांना ज्या दराने अनुदानाची रक्कम द्यायची आहे, त्या दरांनाही मान्यता दिली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जर नुकसान सत्तर टक्क्यांपेक्षा कमी असेल तर सत्तर टक्क्यांच्या दराने भरपाई दिली जाईल, सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास शंभर टक्के भरपाई दिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 29,000 एकर क्षेत्रासाठी या अभ्यासाअंतर्गत सुमारे 53 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे मदतीची मागणी शेतकरी करत होते. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी जमिनीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथके पाठवण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला होता, दिल्ली मंत्रिमंडळाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना प्रति एकर 20,000 रुपये या दराने सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. मंत्रिमंडळाने नुकसानीच्या मुल्यांकनानुसार शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यायचे असलेल्या दरांनाही मंजुरी दिली, असे सरकारकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्लीमध्ये ऑक्टोबर 2021 दरम्यान सगळीकडे पावसाने नाले ओव्हरफ्लो आणि मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

आता महाराष्ट्रातील शेतकरी देखील आर्थिक संकटात आला आहे, मात्र सरकारकडून मदत केली गेली नाही. यामुळे शेतकरी नाराज आहेत. याआधी झालेली मदत देखील फारच कमी प्रमाणावर केली गेली आहे. यामुळे आता शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत दिल्लीत हवामान देखील खूपच खराब आहे. यामुळे शेतीसाठी हे हवामान खूपच खराब झाले आहे. यात अनेक शेतकऱ्यांनी खर्च करून काही पिके जगवली मात्र अवकाळी पावसामुळे ती देखील हातातून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे

English Summary: 20,000 per acre subsidy to untimely affected farmers, big decision of the government
Published on: 29 January 2022, 04:22 IST