News

शेगांव : तालुक्यात सर्वत्र सोमवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलाच जोर धरला धोधो पाऊस पडल्याने शेगांव तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे.

Updated on 07 September, 2021 11:02 PM IST

शेगांव : तालुक्यात सर्वत्र सोमवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून वातावरणात बदल होऊन  विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलाच जोर धरला धोधो पाऊस पडल्याने शेगांव तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. जवळा पळसखेड येथे शेतनाल्यावर आंघोळीसाठी गेलेला १८ वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना यादरम्यान घडली आहे. 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक ६ सप्टेंबर सायंकाळ पासून शेगाव तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सार्वत्रिक भागामध्ये नदी-नाल्यांना पुर आला आहे. बाळापुर रोडवर असलेल्या जवळा पळसखेड या गावात राहणारा आदित्य संतोष गवई वय १८ वर्ष हा युवक

त्याच्या मित्रांबरोबर गावातून वाहत असलेल्या शेत नाल्यावर पूर आल्याने आंघोळीसाठी गेला होता. आंघोळी दरम्यान हा युवक त्याच्या मित्रांना तो पाण्यामध्ये डुबला असल्याचे लक्षात आले त्यांनी बराच वेळ त्या ठिकाणी शोध घेतला मात्र तो कदाचित वाहून गेला असेल असा निष्कर्ष त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. परिसरातील नागरिक पोहणारे युवक त्याठिकाणी त्या नाल्याच्या पाण्यामध्ये त्या वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आली असून

घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटांगे पोलीस नायक कॉन्स्टेबल प्रवीण ईतवारे हे दाखल झालेले आहेत. ही घटना आज सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान घडली असून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नव्हता अशी माहिती घटनास्थळी दाखल झालेले पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण मेटांगे यांच्याकडून मिळाली आहे. याप्रसंगी गावातील युवक तसेच परिसरातील युवक हे पोलिसांच्या मदतीने वाहून गेलेल्या संतोष गवई याचा शोध घेत आहेत.

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: 18 year old youth who went for bath on Shet Nala was carried away
Published on: 07 September 2021, 11:02 IST