बीड जिल्ह्यातील ८ बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. आज परळीची देखील मतदान प्रक्रिया पार पडली असून निकाल हाती येणार आहे. यापूर्वी नगरपंचायत निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी चुरस पाहायला मिळाली. येथील निकाल जाहीर झाला असून धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा पराभवाचे तोंड दाखवले आहे.
सर्वच्या सर्व १८ जागा गमावल्याने पंकजा मुंडे यांचे खांदे समर्थक असलेल्या राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास महाआघाडीच्या १८ पैकी १८ सदस्यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. यामुळे समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.
बावऱ्या बैलासमोर गौतमी पाटीलचा डान्स, कार्यक्रमाला एकाही व्यक्तीची उपस्थिती नाही...
वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी चुरस पाहायला मिळाली. याठिकाणी जोरदार लढत बघायला मिळाली. यामुळे कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. बीड जिल्ह्यात बाजार समिती निवडणूक सर्वसाधारण मानल्या जायच्या. मात्र यावेळेस अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.
शेतकऱ्यांनो उष्माघात कसा टाळायचा, वाचा सविस्तर, अनेकांनी गमावलेत जीव
यामध्ये जास्त लक्ष गेवराई वडवणी आणि परळीकडे लागलं होतं. यात राष्ट्रवादीच्या पॅनलमधील अठरा पैकी अठरा उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. यामध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंसाठी एक मोठा आणि जिंकण्यासाठी वडवणी सर्कल एक हाती असायचा. मात्र पंकजा मुंडेंच्या हाती आलेल्या सत्तेनंतर या सर्कलमध्ये फक्त एक वेळेस पंकजांना पंचवार्षिक सत्ता भोगण्यास मिळाली.
काय सांगता! गायीने दिला 'सिंहाच्या बछड्याला' जन्म, जबडा आणि पंजा पाहून सर्वच हैराण..
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुण्यात पावसाला सुरुवात, दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, गड राखण्यासाठी अनेकांची पळापळ..
Published on: 29 April 2023, 09:53 IST