सध्या गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याला दर नसल्याने तो विकायला घेऊन जाणे सुद्धा शक्य होत नाही. यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
असे असताना आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती येथील कल्याण भानुदास वारगड या शेतकऱ्याला १६ गोण्यांचे (७७३ किलो) फक्त ७१ रुपये आले आहेत. त्यांच्या पट्टीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
त्यांना मोकळ्या (बारदाना) पिशव्यांचे ५१२ रुपये देणे बाकी आहे. कांद्याच्या दोन प्रतवारी करण्यात आल्या होत्या. यामध्ये (९ पिशव्या) ४४० किलो मालाचे ६६० रुपये झाले तर (७ पिशव्या) ३३३ रुपये झाले.
हे सरकार गाई पाळणाऱ्यांना दरमहा देणार पैसे, संस्कृती नष्ट होत असल्याने घेतला निर्णय..
असे एकूण ९९३ आले. त्यातून हमाली ६१.०७ , तोलाई ३६. ३३, स्त्री हमाली २४. ०० व मोटर भाडे ८०० रुपये असा एकूण खर्च ९२१. ४० पैसे एवढा खर्च झाला. खर्च वजा जाता वारगड यांच्या हातात अवघे ७१ रुपये मिळाले.
काळा पेरू ठरतोय फायदेशीर, औषधी असल्याने मागणीही जास्त...
जिंती येथील शेतकरी कल्याण वारगड या शेतकऱ्याने यंदा पाऊण एकर कांद्याची लागवड केली होती. गेल्या महिन्यात २० पिशव्या बाजारात पाठवल्या तर त्याचे फक्त दोन हजार रुपये बिल आले. यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांसाठी आयुक्त मैदानात..
राज्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांसाठी आयुक्त मैदानात..
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार
Published on: 16 May 2023, 04:04 IST