कोठेही इतिहास घडवायचा असेल तर एकत्रीकरण खूप महत्वाचे आहे. एकत्रित न झाल्यास इतिहास हा घडूच शकणार नाही. परंतु जेव्हा जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी जेव्हा एकत्र येतो तेव्हा इतिहासच घडतो.चक्क 15000 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक जिनिंग कंपनीच उभारली आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम लागले आहे तसेच यातून अनेक प्रकारचे रोजगार सुदधा उपलब्ध झालेले आहेत परंतु चक्क शेतकऱ्यांनी एकत्र समूहाने येऊन जिनिंग कंपनी(company) उभारणे हे खरच अद्भुत आहे. परंतु यातून शेतकऱ्यांनी एकवट आल्यावर काय होते यातून दाखवून दिले आहे.
शेतकरी वर्गाच्या पिकाला भाव मिळत नसल्यामुळे हि युक्ती लढवली:
शेतकरी शेतात काबाडकष्ट करून धान्य पिकवत असतात परंतु त्यांच्या पिकाला कधीच योग्य भाव मिळत नाही. हे सर्व होते फक्त शेतकरी वर्ग संघटित नसल्यामुळे. परंतु नंदुरबार मधील 15000 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिनिंग फॅक्टरी उभारली आहे.शेतकरी वर्गाने स्वतः माल पिकवून त्याचा भाव करण्याचा त्यालाच अधिकार नसल्यामुळे तेथील जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनीधी हे शेतकऱ्यांप्रती तत्परता दाखवण्यात दिरंगाई करत असतात.त्यामुळे नंदुरबार मधील शेतकऱ्यांनी एकत्र एकूण जिनिंग कंपनी उभारली आहेत. त्यामुळं अनेक लोकांना तिथं रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत.
नंदुरबार मध्ये सर्वात जास्त उत्पादन हे कापसाचे होते. परंतु कापूस विकण्यासाठी योग्य अशी आणि मोठी बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल आणि नुकसान सुद्धा होते.मोठी बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांना माल हा खूपच कमी किमतीत विकावा लागत आहे. या साठी शेतकर्यांचे नुकसान आणि व्यापारी वर्गाकडून होणारी पिळवणुक थांबवण्यासाठी तेथील 15000 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वनश्री या जिनिंग फॅक्टरी ची उभारणी केली आहे.त्यामुळे कापसापासूनचे उत्पादन तर सुरु झाले आहे. त्यामुळे या जिनिंग कंपनी मुळे कापसाला योग्य भाव आणि योग्य पद्धतीने कापसाची साठवणूक सुद्धा होत आहे. या कंपनी पासून शेतकरी वर्गाला मोठा नफा मिळत आहेत.
राज्यातील पहिलाच प्रोजेक्ट:-
शेतकरी वर्गाच्या पिकाला भाव मिळत नसल्यामुळे तेथील 15000 शेतकऱ्यांनी एकत्र येवून जिनिंग कंपनी ची स्थापना केली. ही राज्यातील पहिलीच कंपनी आहे जी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभारणी आहे.या जिनिंग कंपनीचा असा फायदा आहे की, आता जिथं उत्पादन होईल तिथंच आता मालाची विक्री करण्यात येणार आहे यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तसेच यातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला शिवाय वाहतूक खर्च कमी आणि वेळेची बचत सुद्धा होणार आहे.
या कंपनीचे सदस्य म्हणून 10 शेतकरी आणि कंपनी स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1)पॅन कार्ड
2)आधार
3)मतदान ओळखपत्र,
4)ड्राइविंग लायसन्स
4बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक
5)कंपनीच्या डायरेक्टरचे लाईट बिल
6)10 सभासद त्यापैकी 5 डायरेक्टर
7)10 शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाइल
Published on: 12 October 2021, 01:51 IST