देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार कडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.
परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी (FPO) स्थापन करावी लागेल, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असावेत. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याद्वारे शेतकरी शेतीशी संबंधित उपकरणे किंवा खते, औषधे आणि बियाणे यासारख्या गोष्टी खरेदी करू शकतील. माहितीनुसार, 2023-24 पर्यंत 10 हजार एफपीओ तयार करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.
STIHL : शेतीतील महिलांसाठी STIHL उपकरणे वरदान!
नोंदणीसाठी, तुम्हांला FPO चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), व्यवस्थापकीय संचालक (MD) किंवा व्यवस्थापक यांचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक प्रदान करावा लागेल. तसेच यासंबंधीची कागदपत्रेही द्यावी लागतील. याशिवाय FPO च्या उच्च अधिकाऱ्यांचे बँक डिटेल्सही द्यावे लागतील. यामध्ये बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोडचा समावेश असेल.
Published on: 26 March 2023, 05:32 IST