मुंबई: गेल्या वर्षी जून 2018 मध्ये वादळी वारा व अवेळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी केळी उत्पादक शेतकऱ्यांना 15 कोटी 82 लाख रुपयांची मदत देण्यास मान्यता दिली आहे. ही रक्कम तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
गेल्या वर्षी 1 जून ते 21 जून 2018 या कालावधीत जळगाव जिल्ह्यात वादळी वारा व अवेळी पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 15 कोटी 82 लाख 53 हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 8,013 शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम तातडीने देण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
Published on: 04 June 2019, 07:37 IST