News

औरंगाबाद - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींचा मृदा व जलसंधारणाचा प्राथमिक अंदाज आराखडा तयार करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेसंदर्भात जिल्हा संनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली.

Updated on 23 January, 2022 10:22 PM IST

औरंगाबाद - नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींचा मृदा व जलसंधारणाचा प्राथमिक अंदाज आराखडा तयार करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनई प्रकल्प योजनेसंदर्भात जिल्हा संनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. 

 या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.आर. देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदींसह कृषी विभागाचे उपविभागीय अधिकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुसऱ्या आआणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये  औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुंलब्री 24 वैजापूर 54, गंगापूर 35 खुलताबाद, 11, सिल्लोड 30, सोयगाव 22 आणि कन्नड तालुक्यातील 53 गावांचा समावेश आहे.

कृषी विभाग आणि  ग्राम संजीवनी समितीच्या समन्वयाने जल व मृदा संधारणातील कामांबाबतचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. जल व मृदासंधारण कामांमध्ये  सिमेंट नालाबांध, कंपोजिट गॅबियन, कंपार्टमेंट बंडिंग, नाला  खोलीकरण, अनघड दगडी  बांध, समतल चर, माती  नाला बांध आदी कामांचा  समावेश असल्याचे डॉ. मोटे  यांनी जिल्हाधिकीर यांना या वेळी  माहिती दिली. पोकरा योजनेअंतर्गत सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबादच्या उपविभागनिहाय लाभांबाबतची सध्याची माहिती  सादर करण्यात आली. यात वैयक्तिक लाभाचे घटक, तालुकानिहाय वितरीत अनुदान, कृषी विकास घटकाचा प्रगती अहवाल, सूक्ष्म नियोजन प्रक्रिया आदींचाही समावेश होता. 

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये 1 हजार 175 नवीन गावांच समावेश झाल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या आदीच्या सत्येत बाबत कृषी विभागाकडे सतत विचारणा होत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली संबंधित यादी चुकीची आहे. त्यावर विश्वास ठेवून नये, पोकरामध्ये  नव्याने कोणत्याही गावांची  निवड झालेली नाही. जिल्ह्यात पूर्वी  निवडलेल्या  406 गावांमध्ये कोणतीही भर पडली नसल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  तथा  आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.  तुकाराम मोटे यांनी कळविले आहे.

English Summary: 130.88 crore preliminary estimate for soil and water conservation approved
Published on: 23 January 2022, 10:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)