News

मुंबई: राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे दालन खुले करून दिले आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांची मेगा भरती होणार आहे. या मेगा भरतीमुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणांना सुवर्णसंधी चालून आली आहे.

Updated on 04 March, 2019 7:51 AM IST


मुंबई:
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे दालन खुले करून दिले आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांची मेगा भरती होणार आहे. या मेगा भरतीमुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणांना सुवर्णसंधी चालून आली आहे.

ग्रामविकास विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांवर ही मेगाभरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी तर होईलच, शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी मेगाभरती बाबतचा हा निर्णय घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे आदेश काढले आहेत.

खालील पदांसाठी होणार मेगाभरती:

ग्रामविकास विभागाच्या आस्था 8 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहाय्यक), पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे. 

ही मेगाभरती राज्यातील सहाही विभागात होणार असून सर्वाधिक जागा पुणे विभागात 2 हजार 721 असून तर त्या खालोखाल औरंगाबाद विभागात 2 हजार 718 आहेत. नाशिक विभागात 2 हजार 574, कोकण विभागात 2 हजार 51, नागपूरमध्ये 1 हजार 726 तर अमरावती विभागात 1 हजार 724 अशा एकूण 13 हजार 514 जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरवात होणार आहे.

English Summary: 13 thousand 514 seats recruitment in the Rural Development Department
Published on: 03 March 2019, 08:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)