News

नवी दिल्ली: गेल्या 13 नोव्हेंबर पर्यंत देशातील 202 साखर कारखान्यात 121.88 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून 10.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 2018-19 या साखर वर्षात देशभरात 324 लाख टन साखरेचे उत्पादन होईल हे अपेक्षित आहे अशी आशा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Updated on 17 November, 2018 8:00 AM IST


नवी दिल्ली:
गेल्या 13 नोव्हेंबर पर्यंत देशातील 202 साखर कारखान्यात 121.88 लाख टन ऊसाचे गाळप झाले असून त्यातून 10.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 2018-19 या साखर वर्षात देशभरात 324 लाख टन साखरेचे उत्पादन होईल हे अपेक्षित आहे अशी आशा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

गतवर्षी याच कालावधीत म्हणजे 13 नोव्हेंबर पर्यंत साधारणतः 19 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू साखर वर्षात महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 5.60 लाख टन साखरेचे उत्पादन (62.92 लाख टन ऊस गाळप) झाले असून त्या खालोखाल कर्नाटकाचा नंबर लागतो. तेथे 2.30 लाख टन साखरेचे उत्पादन (24.21 लाख टन ऊस गाळप) झाले आहे. याच कालावधीत उत्तर प्रदेशात 1.10 लाख टन साखरेचे उत्पादन (12.79 लाख ऊस गाळप) झाले आहे.

ऊसाचे गाळप व साखर उत्पादनात गुजरात व तामिळनाडू चवथ्या क्रमांकावर असून तेथे याच काळात प्रत्येकी 0.90 लाख टन साखरेचे उत्पादन (11.84 लाख व 10.11 लाख टन ऊस गाळप) झाल्याचे श्री. वळसे पाटील यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 103 साखर कारखाने चालू स्थितीत असून उत्तर प्रदेशात अशा कारखान्यांची संख्या 42 आहे तर कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूत त्यांची संख्या अनुक्रमे 28, 14 व 10 अशी आहे.

श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले 2018-19 या साखर वर्षात उत्तर प्रदेशातून 122 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे तर महाराष्ट्रातून 97 लाख टन, कर्नाटकातून 41 लाख टन, गुजरात मधून 11 लाख टन, तामिळनाडूतून 10 लाख टन, बिहार, पंजाब व हरियाणातून प्रत्येकी 8 लाख टन, मध्यप्रदेशातून 6 लाख टन, आंध्रप्रदेशातून 5 लाख टन, उत्तराखंडातून 4 लाख टन, तेलंगणा आणि उर्वरित देशातून प्रत्यकी 2 लाख टन साखरेचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
      

English Summary: 121.88 lakh tons of sugarcane crushing in Maharashtra
Published on: 17 November 2018, 07:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)