केंद्र सरकारचे महत्वकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात.
परंतु या योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे काही दिवसात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी आता दुप्पट होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह नुकतीच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली यावेळी पंतप्रधान किसान सन्मानयोजनेचा निधी दुप्पट करणार असल्याची चर्चा झाल्याचे समजते.
या भेटीतील झालेल्या चर्चेच्या हवालानुसार अमरेंद्र प्रताप सिंह यांनी सरकार पी एम किसान सन्मान योजनेचीरक्कम दुप्पट करणार असल्याचा दावा केला आहे. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान या योजनेअंतर्गत गेल्या सोमवारी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. बळीराजाचे जीवन सुसह्य आणि सुखाची करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मोदी यांनी रविवारी म्हटले होते.
या योजनेनुसार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात नववा हप्ता जमा करण्यात आला आहे.उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात 30 नोव्हेंबर पर्यंत नवव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावी असा या योजनेचा उद्देश असूनया योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2018 मध्ये केली होती.
संदर्भ- पुढारी
Published on: 30 August 2021, 01:16 IST