News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावे देणार आहेत.

Updated on 05 September, 2022 9:37 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावे देणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. गणपतीच्या दर्शनानिमित्ताने फडणवीस राजभवनावर गेले असताना आता विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुका लवकरच होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

महाविकास आघाडी सरकारने १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव वर्षापूर्वी पाठवला होता. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी ४ सदस्य होते. त्याला अद्याप राज्यपाल यांनी मंजुरी दिलेली नाही.

ब्रेकिंग: मविआच्या 12 आमदाराबाबत राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय; आता...

दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीची यादी रद्द करावी, असे पत्र राजभवनला पाठवले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार लवकरच १२ सदस्यांच्या नियुक्त्या मार्गी लावेल, असे समजते. त्यासंदर्भात रविवारी फडणवीस आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाल्याचे समजते आहे.

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या-कोणत्या दिवशी DA वाढीची घोषणा होणार..

विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांवर नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. मात्र, ही नियुक्ती करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो.

कलम १६३ (१) अंतर्गत विधान परिषदेच्या जागांसाठी राज्यपाल नियुक्ती करू शकतात. तर कलम १७१ (५) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते. 

"अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार"

English Summary: 12 MLAs will be appointed to the Legislative Council soon
Published on: 05 September 2022, 09:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)