News

मागील काही दिवसांत राशिवडे गावात लम्पीमुळे चार गाईंचा मृ्त्यू झाला आहे. या घटनेची प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यामुळे आणखी १२ गाईंचा मृ्त्यू झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Updated on 01 September, 2023 3:35 PM IST

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावात लम्पी रोगामुळे ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

मागील काही दिवसांत राशिवडे गावात लम्पीमुळे चार गाईंचा मृ्त्यू झाला आहे. या घटनेची प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यामुळे आणखी १२ गाईंचा मृ्त्यू झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. 

राशिवडे गावासह अन्य गावांमध्ये जनावरांची संख्या विचारात घेता लम्पी आटोक्यात आणण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची गरज आहे. परंतु याकडे संबंधित विभागाकडून लक्ष दिले जात नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांतून पुढे येत आहेत.

दरम्यान, लम्पी विळख्यात विशेष करून बैल, दुभत्या गाई आणि कालवडींचा समावेश आहे. जनावरे मृत्यूची संख्या आणि रोग आटोक्यात आणण्यासाठी युध्दपातळीवर कार्यवाही गरजेची आहे.

English Summary: 11 animals died in Kolhapur district due to lumpy infection
Published on: 01 August 2023, 02:00 IST