शेतकऱ्यांना बिजोत्पादन करण्यासाठी शासन स्तरावरून 100 टक्के अनुदान दिले जातआहे. त्यासोबतच यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील केले जात आहे. या बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांना सहभाग नोंदवण्यासाठी किती अनुदान मिळणार आहे याची माहिती आपण या लेखात मार्फत घेणार आहोत.
कोणाला याचा लाभ मिळू शकतो?
शासकीय,सहकारी, निमशासकीय संस्थांच्या किंवा शेतकरी उत्पादन कंपनीच्या बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सहभागी शेतकरी तसेच थेट बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी करूनशेतकरी देखील या बीजोत्पादन कार्यक्रम मध्येआपला सहभाग नोंदवू शकतात.यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा असणे आवश्यक आहे.
बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत किती मिळेल अनुदान?
- पायाभूत बियाणेची किंमत आणि प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
- प्रत्यक्ष खर्चाच्या शंभर टक्के किंवा कमीत कमी 15 हजार रुपये प्रति हेक्टरी किती अनुदान शेतकऱ्यांना मिळते.
- त्यासाठी एका खातेदाराने जास्तीत जास्त दहा एकर बीजोत्पादन क्षेत्रात बीजोत्पादन केले तर एक लाख 50 हजार रुपये अनुदान हे या योजनेअंतर्गत मिळते.
या योजनेअंतर्गत कसे मिळेल अनुदान?
1-बिजोत्पादक शेतकऱ्याला अनुदानाची मागणी ही संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे करावी लागणार आहे.
2-तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
3-यामध्ये पायाभूत बियाणे खरेदी पावतीची मुळप्रत, बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे शुल्क अदा केल्याच्या पावतीची मुळप्रत, कृषी सहाय्यक यांचा प्रक्षेत्र पाहणी केलेला अहवाल जोडावे लागणार आहे.
4-यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- अर्जदारासhttps://dbt.mahapocra.gov.inया संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
- यासाठी सातबारा उतारा,शेतकऱ्याचे हमीपत्र,बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे केलेली नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
- त्यानंतर ग्राम कृषी संजीवनी यासाठी मंजुरी देईलव उपविभागीय कृषी कार्यालयाच्या पूर्वसंमती नंतर बीजोत्पादन करता येणार आहे.
- पेरणीनंतर कृषी सहाय्यक हे बीज उत्पादन क्षेत्राची पाहणी करून ते प्रमाणित आहे का नाही हे ठरवतील.
( संदर्भ- हॅलो कृषी)
Published on: 10 December 2021, 05:34 IST