News

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोखरा या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील जवळ जवळ 80 हजार 460 शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते.त्यातील दहा हजार 102 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून या माध्यमातून जवळपास 50 हजार एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे.

Updated on 30 December, 2021 10:09 AM IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोखरा या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील जवळ जवळ 80 हजार 460 शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते.त्यातील दहा हजार 102 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून या माध्यमातून जवळपास 50 हजार एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे.

सध्या हवामान बदलामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचा सामना करून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम व्हावी यासाठी शासनाकडून 365 गावांमध्ये तीन टप्प्यात पोखरा योजना राबवली जात आहे. योजना 2024 पर्यंत राबवली जाणार आहे. पोखरा योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन,संरक्षित सिंचन, विहीर पुनर्भरण सारख्या तसेच शेडनेट, पॉली हाउस, कृषी यांत्रिकीकरण यासारख्या कामांसाठी अनुदान दिले जाते. या सगळ्या घटकांमध्ये सूक्ष्म सिंचन, शेततळे आणि तुषार सिंचन अधिक योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यासाठी 80 हजार 460 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. परंतु त्यामधील 10102 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष काम पूर्ण केले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर 47 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान थेट जमा झाले आहे. पोखरा योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी फळबागांसाठी शाश्वत पाणी चा साठा उपलब्ध व्हावा याकरिता शेततळे खोदन्यालाप्राधान्य दिले आहे. 

जर शेततळ्यांच्या साठीचा अर्जाचा विचार केला तर त्यासाठी 17 हजार 852 शेतकऱ्यांना अर्ज केले होते. त्यापैकी 4 हजार 58 शेतकऱ्यांना कृषी विभागाने शेततळे खोदण्यासाठी पूर्वसंमती दिली होती. त्यातील 2593 शेतकऱ्यांनी शेततळ्याचे काम पूर्ण केले असून शेतकर्‍यांना शासनाकडून त्यासाठी 54 कोटी 28 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ( संदर्भ- मराठी पेपर)

English Summary: 10 thosand farmer in jalana district take benifit to micro irrigation scheme
Published on: 30 December 2021, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)