नवी दिल्ली - लांबलेल्या मान्सूनमुळे उत्तर-दक्षिण भारतात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. लाखो भारतीयांना उष्णतेची झळ जाणवत असून उत्तर भारतातील काही भागात तापमान ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने उत्तर भारतासहित अन्य काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे.
वास्तविक किमान तापमान हे सामान्य किमान तापमानापेक्षा म्हणजे ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक असल्यास उष्णतेची लाट मानली जाते. जूनप्रमाणे जुलै महिनाही अधिक उष्णमान ठरला आहे. केवळ भारतामध्ये नव्हे तर जगभरातील प्रमुख शहरांमध्ये देखील अधिक उष्णता दिसून आली आहे.
भारतातील सर्वाधिक उष्ण प्रदेश
भारतात आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्यात उष्णतेमुळे बळी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार भारतातील सर्वाधिक १० उष्ण प्रदेश:
फतेहगड (उत्तर प्रदेश) ४२. ५ डिग्री सेल्सिअस
गुरुग्राम (हरयाणा) ४१.८ डिग्री सेल्सिअस
गंगानगर (राजस्थान) ४१.८ डिग्री सेल्सिअस
हिस्सार (हरयाणा) ४१. ७ डिग्री सेल्सिअस
सवाई माधोपूर (राजस्थान) ४१. ४ डिग्री सेल्सिअस
भटिंडा (पंजाब) ४० डिग्री सेल्सिअस
दिल्ली ३९.५ डिग्री सेल्सिअस
उना (हिमाचल प्रदेश ) ३९.४ डिग्री सेल्सिअस
चंदीगड- ३८.२ डिग्री सेल्सिअस
कठुआ (जम्मू-काश्मीर) ३८ डिग्री सेल्सिअस
Published on: 09 July 2021, 05:26 IST