News

मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीतही राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन १० लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.

Updated on 04 April, 2020 8:29 AM IST


मुंबई:
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीतही राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन १० लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.

संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण देशामध्ये २४ मार्च पासून लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्याप्रमाणात बंद झाली आहेत. परिणामी राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांपुढे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झालेला होता.

अतिरिक्त दूधाचे नियोजनावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षतेखाली ३१ मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (पदुम), आयुक्त, दुग्धव्यवसाय, व्यवस्थापकीय संचालक, महानंद व इतर अधिकारी उपस्थित होते.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांनी राज्यातील प्रतिदिन १० लक्ष लिटर अतिरिक्त होणाऱ्या दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने प्रतिदिन १० लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी रु.१८७ कोटी निधीची मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाच्या अनुषंगाने अतिरिक्त दुधापैकी प्रतिदिन १० लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी रु.१८७ कोटी निधीची तरतूद करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

English Summary: 10 lakh liters of milk per day allowed to be converted into milk powder
Published on: 04 April 2020, 08:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)