'मुख्यमंत्र्यांना नक्की कसली भीती वाटते', राजू शेट्टी यांचा बारसू प्रकरणावरून सवाल
१. बारसूतील रिफायनरी प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील शेतकऱ्यांची साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी हे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी बारसूमध्ये जाणार होते. मात्र रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ३१ मे पर्यंत जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे.
एवढंच नाही तर सोशल मीडियावर बारसू प्रकरणावर कोणतीही पोस्ट किंवा चित्रफीत करायची नाही असं देखील त्यांना सांगण्यात आल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं आहे. आता यावर ते थेट मुख्यमंत्र्यांनाच तुमच्या भीतीच नक्की कारण काय असा सवाल करणार पत्र लिहिणार असल्याचं ते म्हणालेत
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटूंबासाठी मोठी घोषणा
२. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटूंबाना मोठा दिलासा दिला आहे. पिकांच्या नुकसानीची चिंता न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सामान्य धानाला जेवढी रक्कम दिली जाते तेवढीच रक्कम नुकसान झालेल्या पिकांना देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे.
तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट हे शेतीचे संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच सततच्या अवकाळी पावसामुळे पीक काढणी तीन ते चार दिवस पुढे ढकलणे चांगले, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. महाराष्ट्रातही अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवली
३. अवकाळीमुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर आहे तसेच आहेत. कांदयाला भाव नाही त्यात अवकाळीमुळे कांद्याचा दर्जाही घसरला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवली आहे.
आता बारसुतील शेतकऱ्यांसाठी हिंगोलीतील स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरणार, राज्य सरकारला विचारणार जाब
४. बारसू प्रकरण चांगलंच तापलं आहे. बारसुतील शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील हिंगोली रस्त्यावर उतरणार आहे. बुलढाण्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज का? बारसु तील शेतकऱ्यांवर लाठी चार्ज का ? सामान्यांना घरे निष्कासित करण्याच्या नोटीसा देऊन सरकार बेघर करणार का ? असे प्रश्न उपस्थित करून शेतकरी संघटना आंदोलन करणार आहेत. आमच्यावर ही गोळ्या घाला तरी आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी १० एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा
५. लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी १० एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल आहे. कृषी महाविद्यालयाच्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
इथल्या शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन कृषी शिक्षण तसेच संशोधनासाठी दिली आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी आपण दहा एकर जागा देऊ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कोविडमध्ये दोन वर्षे जी सोयाबीन परिषद झाली नाही ती लातूर मध्ये १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
अधिक बातम्या:
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
खजूर शेती आहे खूपच फायद्याची, खजुराचे एक झाड देते हजारो रुपयांचे उत्पन्न, शेतकरी काही वर्षात करोडपती
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका; किलोला मिळतोय दोन रुपयांचा दर
Published on: 03 May 2023, 02:41 IST