News

कमी वेळात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ नवनवीन प्रयत्न करत असतात. वास्तविक, पीकविषयक समस्यांच्या निदानासाठी शेतकऱ्यांना अनेकदा जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर जावे लागते.

Updated on 16 February, 2022 3:57 PM IST

कमी वेळात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ नवनवीन प्रयत्न करत असतात. वास्तविक, पीकविषयक समस्यांच्या निदानासाठी शेतकऱ्यांना अनेकदा जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर जावे लागते. यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत असली तरी आता शेतकऱ्यांच्या पिकाशी संबंधित अडचणी काही मिनिटांत दूर होणार आहेत.

इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूरच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या पिकांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक नवीन तंत्र आणले आहे. रायपूर, छत्तीसगड येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी समन्वय केंद्रे (कंपोस्ट-बीज केंद्र) सह व्हॉट्सअँप ग्रुप तयार केला आहे. ज्या गटात जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांव्यतिरिक्त कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञही सहभागी आहेत. या गटाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या अडचणी काही मिनिटांत दूर होणार आहेत.

यासाठी शेतकरी त्यांच्या पिकांच्या समस्या व्हॉट्सअँप ग्रुपवर शेअर करतील, शास्त्रज्ञ त्या समस्यांवर उपाय सांगतील. शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नामुळे शेतकर्‍यांना पिकाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

Whatsapp ग्रुप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

1. शेतकऱ्यांच्या समस्येवर सहज तोडगा निघेल.

2. वेळेची बचत होते.

3. पिकांचे प्रश्न वेळेवर सुटतात.

वैज्ञानिकांनी तयार केलेल्या या व्हॉट्सअँप ग्रुप्सना किसान वैज्ञानिक मंच आणि किसान समाधान अशी नावे आहेत. राज्यातील बहुतांश शेतकरी या गटाशी संबंधित आहेत. या व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये सहभागी होऊन शेतकरी त्यांच्या स्वत:च्या व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांच्या पिकाशी संबंधित समस्या सोडवत आहेत. शेतकऱ्यांसाठी हा प्रयत्न अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

English Summary: 1 message will solve the problems of farmers
Published on: 16 February 2022, 03:57 IST