Wheat Price Update : देशात सातत्याने वाढणाऱ्या गव्हाच्या किमती आता नियंत्रणात आल्या आहेत. देशभरातील बाजारपेठांमध्ये गव्हाची आवक सुरू झाली आहे. गव्हाचे नवीन पीक बाजारात येत असल्याने भावही घसरत आहेत. अवघ्या महिन्याभरापूर्वी गव्हाला प्रचंड मागणी आणि आवक कमी यामुळे गव्हाचे दर चांगलेच वाढले होते. अनेक बाजारपेठांमध्ये किमान आधारभूत किमतीच्या जवळपास दुप्पट दराने गहू विकला जात होता. पण आता भाव जवळपास आधारभूत किमतीच्या जवळ आलेत. बाजार समितीत गव्हाची आवक सुरू असल्याने भावात नरमाई आली आहे. हे भाव आता आधारभूत किमतीच्या बरोबरीने पोहोचले आहेत.
गव्हाच्या दरात नरमाई
मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात गव्हाच्या दरात मोठी नरमाई पाहायला मिळाली आहे. गेल्या महिन्यात हेच भाव ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेले होते. पण आता या किमती एमएसपीच्या बरोबरीने पोहोचल्या आहेत. केंद्र सरकारने २०२३-२४ साठी गव्हाची आधारभूत किमत २ हजार २७५ रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे. देशातील एखादी बाजार समिती वगळता बहुतेक बाजार समितील गव्हाचे दर आधारभूत किमतीच्या जवळ आले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या Agmarknet पोर्टलनुसार, मंगळवारी (दि.१) रोजी कर्नाटकातील बेंगळुरू आणि शिमोगा बाजार समिती वगळता देशातील सर्व बाजार समितीत गव्हाची किंमत प्रति क्विंटल ४ हजार रुपयांच्या खाली राहिली. बेंगळुरू आणि शिमोगा मंडईमध्ये गहू सर्वाधिक ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.
मध्यप्रदेशातील विदिशा बाजार समितीत गहू ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटलने विकला गेला. तर बदनावर मंडईत सर्वात कमी भाव मिळाला. तर कुठे २ हजार १३० रुपये प्रति क्विंटल दराने गहू विकला गेला. ही किमत आता आधारभूत किमतीच्या खाली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सांगली बाजार समितीत गव्हाला ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा सर्वोत्तम भाव मिळाला. तर औरद शहाजानी बाजार समितीत २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा सर्वात कमी भाव मिळाला. राजस्थान, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतही हीच स्थिती आहे. गव्हाला सरासरी २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळतोय. जो आधारभूत किमती पेक्षा थोडा जास्त आहे. त्याचवेळी अनेक बाजार समितीतील भाव एमएसपीच्या खाली गेले आहेत.
इतर पिकांची यादी येथे पहा
कोणत्याही पिकाची किंमत त्याच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असते. अशा स्थितीत व्यापारी गुणवत्तेनुसार किंमत ठरवतात. पिकाचा दर्जा जितका चांगला तितका चांगला भाव मिळेल. तुम्हाला तुमच्या राज्यातील बाजार समितीमधील विविध पिकांच्या किमतीही पाहायच्या असतील, तर तुम्ही https://agmarknet.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन दर पाहू शकता.
Published on: 02 January 2024, 04:21 IST