Market Price

APMC Market: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. आवक घटल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे.

Updated on 25 August, 2022 2:51 PM IST

APMC Market: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत भाजीपाला (vegetables) पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांच्या उत्पादनात घट (Decrease in production) झाली आहे. आवक घटल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे (Vegetable crop) नुकसान झाले आहे. तर जो भाजीपाला मार्केटमध्ये येत आहे तो ही पावसात भिजल्यामुळे खराब होत आहे.

नवी मुंबईमधील बाजारात दररोज 550 ते 600 भाजीपाला गाड्यांनी भाजीपाला येत होता मात्र अवाक कमी झाल्यामुळे फक्त ४२४ च गाड्या बाजारामध्ये आल्या होत्या. जो भाजीपाला बाजारामध्ये येत आहे तोही भिजला असल्यामुळे ग्राहकांना घेतल्या दिवशीच तो विकावा लागत आहे. तसेच दर वाढल्यामुळे ग्राहकांनी भाजीपाला खरेदी करायला पाठ फिरवली आहे.

Gold Price Today: सोन्या चांदीच्या किमतींमध्ये वाढ! तरीही सोने 4600 आणि चांदी 24800 रुपयांनी मिळतंय स्वस्त...

यंदा महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी शेतीमध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली नाही. त्यामुळे आवक कमालीचीच घटली आहे.

पावसात भिजलेला भाजीपाला बाजारात विक्रीला येत असल्यामुळे तो एक दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी टिकत नसल्यमुळे शिल्लक राहिलेला माल विक्रेत्यांना कचऱ्यामध्ये फेकून द्यावा लागत आहे.

खुशखबर! सणासुदीच्या मुहूर्तावर मिळणार 18 महिन्यांची थकबाकी! कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ

जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे घाऊक ग्राहकांनी दर वाढीमुळे मार्केटकडे पाठ फिरवली आहे.

महत्वाच्या बातम्या:
PM Kisan: सावधान! पीएम किसान लाभार्थ्यांनो या चुकीमुळे मिळणार नाही १२ वा हफ्ता...
पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ७० टक्के सबसिडी; असा करा अर्ज...

English Summary: Vegetable prices are tight! Increase in rates as inflows decrease
Published on: 25 August 2022, 02:51 IST