Market Price

Tur Rate: देशात आणि राज्यात यंदा काही भागात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामातील शेती कामे उरकली आहेत. तर काही भागात अजूनही पाऊस नसल्यामुळे शेती कामे रखडली आहेत. खरीप हंगामात तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तूर उत्पादकांसाठी यंदा अच्छे दिन असल्याचे बोलले जात आहे. कारण तुरीचे दर गगनाला भिडले आहे.

Updated on 24 August, 2022 12:06 PM IST

Tur Rate: देशात आणि राज्यात यंदा काही भागात समाधानकारक पाऊस (Rain) पडल्यामुळे खरीप हंगामातील (Kharif season) शेती कामे उरकली आहेत. तर काही भागात अजूनही पाऊस नसल्यामुळे शेती कामे (Agricultural works) रखडली आहेत. खरीप हंगामात तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तूर उत्पादकांसाठी (Tur producer) यंदा अच्छे दिन असल्याचे बोलले जात आहे. कारण तुरीचे दर गगनाला भिडले आहे.

सर्वसामान्यांच्या ताटात दररोज वरण भात असते. मात्र ते वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ महत्वाची असते. मात्र यंदा तुरीला बाजारात विक्रमी भाव मिळत असल्यामुळे त्याचा परिणाम डाळीच्या किंमतीवर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व तुरीची पेरणी केली आहे त्यांना चांगला भाव मिळत आहे.

सध्या बाजारात तुरीला चांगलाच भाव मिळत आहे. प्रतिक्विंटल 7 ते 8 हजार रुपये इतका भाव तुरीला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे.अकोला येथे बाजारात 7 हजार 500 तर लातूर बाजारात सरासरी 7 हजार 700 रुपये भाव मिळत आहे.

Soybean Market Price : सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन विकला जातोय 'या' दराने

यंदाच्या खरीप हंगामात तूर उत्पादन घटल्यामुळे तुरीला बाजारात अधिक भाव मिळत आहे. सध्या बाजारात कमी तूर उपलब्ध होत आहे तसेच साठा कमी असल्यामुळे तुरीचे दर गगनाला भिडत आहेत. तुरीचे उत्पादन जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत तुरीचे भाव जास्तच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Weather Update: पावसाने तोडले 29 वर्षाचे रेकॉर्ड; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हंगामातील तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाही तुरीची आवक कमीच होणार असल्याचे चित्र दिसत आहे. जोपर्यंत आवक कमी आहे तोपर्यंत भाव चढेच राहणार आसल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:
शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय; वाचा सविस्तर
Gold Rate: सोन्या चांदीचे नवीन दर जाहीर! 4700 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोने; तपासा नवे दर...

English Summary: Tur Rate: Record price of tur in the market
Published on: 24 August 2022, 12:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)