Market Price

Tomato Rate: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाळ्यात टोमॅटो लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोचे भाव घसरले आहे. त्याअगोदर टोमॅटोचे भाव चांगले होते. मात्र आवक वाढल्याने टोमॅटोचे बाजार कमी झाले आहेत.

Updated on 26 August, 2022 1:51 PM IST

Tomato Rate: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये भाजीपाला पिकांची (Vegetable crop) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पावसाळ्यात टोमॅटो लागवड (Planting tomatoes) देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोचे भाव घसरले (Prices fell) आहे. त्याअगोदर टोमॅटोचे भाव चांगले होते. मात्र आवक वाढल्याने टोमॅटोचे बाजार कमी झाले आहेत.

ज्या भागात टोमॅटोचे जास्त उत्पादन घेतले जाते त्या भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्यामुळे टोमॅटो बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत टोमॅटोला चांगले भाव येण्याची शक्यता आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपये दर मिळत आहे.

सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे अनेक भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. टोमॅटो बागांवर ढगाळ वातावरणामुळे रोग पडत आहेत. तसेच बागांमध्ये पाणी साठल्यामुळे बागा सडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत टोमॅटोचे भाव कडाडण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करायचा आज शेवटचा दिवस! 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा 2186 रुपयांचा फायदा

त्यातच लसनाचेही दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लसूण देण्याची टाकून देण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशमध्ये लसणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा लसणाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे भाव कोसळले आहेत. बाजारात लसणाला १ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. त्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

गोपालखेड येथे जैविक कृषी निविष्ठा केंद्राचे उदघाटन; शेतकऱ्यांना होणार फायदा...

महाराष्ट्रात लसणाला प्रतिकिलो ३० ते ४५ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च तरी निघत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी आहे. येत्या काळात भाजीपाल्याचे दर कडाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:
7th Pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्त्याबाबत सरकारने दिली ही माहिती...
सर्वोत्कृष्ट दूध उत्पादकाला केंद्र सरकार देणार 5 लाख रुपयांचे बक्षीस; 15 सप्टेंबरपर्यंत असा करा अर्ज

English Summary: Tomato Rate: Good day for tomato producers! Chances of rate hike again
Published on: 26 August 2022, 01:51 IST