Onion Price : सध्या राज्यात कांदा दराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आज (दि.२२) रोजी राज्यात कांद्याला सरासरी ९०० ते १७०० रुपयांचा दर मिळाला आहे. आज नाशिकमधील पिंपळगाव बसवत बाजार समितीत कांद्याची ३० हजार क्विंटल आवक झाली आहे. या कांद्याला कमीत कमी ४०० रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त २ हजार १९६ रुपये क्विंटल तर सरासरी १७०० रुपये क्विंटलला दर मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण ५५ हजार २१० क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याला सरासरी १५१९ रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. मुंबई बाजार समितीत कांद्याला आजचा सरासरी सर्वात जास्त दर मिळाला आहे. बाजार समितीत आज कमीत कमी १५०० रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त २१०० रुपये आणि सरासरी १८०० रुपये दर मिळाला आहे.
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातबंदी लागू केल्यापासून राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसंच सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकाची धामधुम सुरु असल्याने शेतकरी प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नसल्याचं दिसून येत आहे. तसंच कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास ३ हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.
Published on: 22 May 2024, 03:03 IST