Onion Price : राज्यात दिवसेंदिवस शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. कधी कोणत्या पिकाला चांगला दर मिळतो तर कधी कोणत्या दुसऱ्या पिकाला दर नसतो. तर सध्या राज्यात टोमॅटो, कांदा, सोयाबीन अन्य इतर शेतमाल्याचा दराच प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या टोमॅटो आणि कांद्याला दर नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मागील दोन दिवसांपासून कांद्याच्या सरासरी दरात किंचीत वाढ झाल्याच दिसून येत आहे. तर आज (दि.२४) रोजी कांद्याला सरासरी ११०० ते २००० रुपयांचा दर मिळाला आहे. ११०० रुपये सरासरी दर हा अमरावती बाजार समिती मिळाला आहे. तर २००० रुपयांचा दर हा नागपूर बाजार समितीत मिळाला आहे. तर सर्वात जास्त ४३ हजार १२३ क्विंटल कांद्याची आवक नाशिकमध्ये झाली आहे. येथे कांद्याला सरासरी १६०० क्विंटलचा दर मिळाला आहे. राज्यात एकूण आवक ६२१६४ क्विंटल कांद्याची झाली आहे.
केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडणचीत आले. परंतु काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. मात्र निर्यातीवर अद्यापही शुल्क लावण्यात आलेले तसेच आहे. यामुळे निर्यातदारांना निर्यातीत अडचण निर्माण झाली आहे.
दरम्यान, कांद्याला दर नसल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या नाराज आहेत. त्यात उन्हाळ कांदा देखील बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
Published on: 24 May 2024, 02:32 IST