मागच्या आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव (soybeans market price) 3 हजारांवर आले होते. आता या तीन- चार दिवसात सोयबिनचे दर पुन्हा पाहिल्यासारखे पहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
काल सायंकाळी 14 सप्टेंबर रोजी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार सोयाबीनला सर्वाधिक 5 हजार 515 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1885 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आणि यासाठी यासाठी किमान भाव 4 हजार 500, कमाल भाव 5 हजार 515 आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 210 इतका मिळाला.
महत्वाचे म्हणजे परवा 13 सप्टेंबर रोजी सर्वाधिक आवक ही कारंजा कृषी उत्पन्न (Karanja Agricultural Income) बाजार समितीत झाली होती. ही आवक (Soybean Market Price) २२०० क्विंटल इतकी आहे. यासाठी किमान भाव 4 हजार 950, कमाल भाव ५ हजार ४५५ आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 225 इतका मिळाला.
मागच्या 2 दिवसांचे सोयाबीन बाजारभाव (Soybean market price) पाहून यामध्ये वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. आज सायंकाळी पर्यंत दर किती मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या दराचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्री करण्यास घेऊन जावे.
Published on: 15 September 2022, 12:59 IST