Market Price

Grape Production : गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे आणि सतत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान यावेळी जास्त प्रमाणात फळाचे झालेले नसून हे पावसामुळे पडलेल्या द्राक्षाचे दर असे झाले आहे. मंगळवारी दिवसभर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Updated on 11 January, 2024 12:32 PM IST

Pune News : राज्यभरात मागील तीन दिवसांपूर्वी तुरकळ ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही पिकांना यांचा फटका बसला आहे. पण काही ठिकाणी जी पिके चांगली राहिली आहेत तरी देखील अवकाळीच्या नावाखाली पिकांचे दर कमी केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे आणि सतत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान यावेळी जास्त प्रमाणात फळाचे झालेले नसून हे पावसामुळे पडलेल्या द्राक्षाचे दर असे झाले आहे. मंगळवारी दिवसभर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली.

कोरोनापासून द्राक्ष उत्पादक अडचणीत
कोरोना काळातील संकटापासून द्राक्ष शेतकऱ्यामागे सुरू झालेली संकटाची मालिका याही वर्षी कायम आहे. गेल्या वर्षी अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा या वर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासमोर आव्हान उभे केले आहे. अवकाळीचा काही पिकांना यांचा फटका बसला आहे. पण काही ठिकाणी जी पिके चांगली राहिली आहेत तरी देखील अवकाळीच्या नावाखाली पिकांचे दर कमी केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अवकाळीचा द्राक्ष दराला फटका
अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. द्राक्षाचा दर्जा घसरला नसला तरी दराचा दर्जा घसरला आहे. ८ जानेवारीला द्राक्षाचे दर ९० ते ९५ रुपये किलो होते. तर लोकल मार्केटचा दर १२० रुपये आणि एक्स्पोर्टचा दर १४० रुपये किलो होता. तोच दर आता ५० ते ६० रुपये किलोवर आला आहे. तसंच द्राक्ष चांगली देखील आहे बाजारात आवक नाही तरी दर कमी आहेत, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश नाझीरकर यांनी दिली आहे.

द्राक्षासह अन्य फळांच्या दरात देखील घसरण झाली आहे. कलिंगडाचे दर २२ ते २४ रुपये किलो होते. ते दर आता १५ रुपयांवर आलेत. त्यामुळे आता फळ उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आले आहेत.

डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा सांगलीतील द्राक्ष पिकांना चांगला फटका बसला होता. या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला होता. तसंच आता अवकाळीच्या नावाखाली देखील व्यापाऱ्यांकडून दर कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील या भागातील शेतकरी सांगतात.

दरम्यान, अहमदनगर, जळगाव, मुंबई, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर बाजार समितीत ९६७ क्विंटल द्राक्षाची आवक झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या संकेतस्थळावरुन मिळाली आहे. तर पुणे आणि मुंबई बाजार समितीत द्राक्षाला सध्या चांगला दर मिळत आहे.

English Summary: Grape rate has fallen in the name of bad season Find out how much the rate is getting grape export rate
Published on: 11 January 2024, 12:32 IST