Market Price

आज सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Bajarbhav) सुधारणा झाल्यामुळे अनेक प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 5 हजाराच्या वर जात आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन 5 हजार 500 रुपयांच्या आसपास विक्री झाला आहे.

Updated on 12 September, 2022 5:37 PM IST

आज सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean prices) सुधारणा झाल्यामुळे अनेक प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 5 हजाराच्या वर जात आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन 5 हजार 500 रुपयांच्या आसपास विक्री झाला आहे.

मात्र सध्या मिळत असलेला दर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित नाही, परंतु 4 हजारांवर गेलेल्या सोयबिनच्या दरात सुधारणा झाली असल्याने दिलसादायक दर ठरत आहेत. सोयाबीन (Soybean Crop) बाजारभावात सुधारणा झाली असल्याने सोयाबीनचे दर अजून वाढतील अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Karanja Agricultural Produce Market Committee) सोयाबीनला 5 हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला तर 4 हजार 500 रुपये किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5 हजार 50 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर केला 'हा' मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5 हजार 172 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 4 हजार 750 रुपये किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4 हजार 961 रुपये मिळाला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4 हजार 972 रुपये कमाल बाजार भाव मिळाला असून 4 हजार 400 रुपये किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सोयाबीनला 4 हजार 829 रुपये एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

घरबसल्या करा गुंतवणूक; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दरमहा मिळतील 5000 रुपये

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Market Committee) सोयाबीन ला 5 हजार 170 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव 4 हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 4 हजार 955 रुपये इतका मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 
राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव; खबरदारी घेण्याची गरज
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक करा; आयुष्यभर पेन्शन राहणार सुरू
आज बुधाची बदलणार चाल; पाहा तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस

English Summary: Good news farmers Improvements soybean prices
Published on: 12 September 2022, 05:27 IST