Market Price

Garlic Price Market : मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र खराब हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नवीन पीक येण्यास विलंब होत आहे. लसणाचे पीक बाजारात येताच. लसणाचे भाव उतरतील. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते खरीप लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

Updated on 05 February, 2024 11:36 AM IST

Garlic Production : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहेत. कधी कांदा शंभरी पार होताना दिसत आहे. तर कधी टोमॅटो. पण आता लसणाने ४०० रुपये किलोचा दर गाठला आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दररोजच्या भाजीची चव वाढण्यासाठी लसनाचा वापर केला जातो. पण आता हा लसून भाजीतून गायब होण्याच्या मार्गावर आहे. तर चला जाणून घेऊयात लसणाचे भाव इतके का वाढत आहेत आणि कधी कमी होणे अपेक्षित आहे.

लसणाचे भाव का वाढत आहेत?

खराब हवामानामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान झाल्याने लसनाचे दर वाढले आहेत. तसंच पीक निकामी झाल्याने दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत. गेल्या काही आठवड्यांबद्दल बोलायचे झाले तर लसणाचे भाव झपाट्याने वाढले आहेत. भुवनेश्वरच्या बाजारात भाव ४०० रुपये किलोवर पोहोचला होता. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे.

भाव कधी कमी होतील?

मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र खराब हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नवीन पीक येण्यास विलंब होत आहे. लसणाचे पीक बाजारात येताच. लसणाचे भाव उतरतील. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते खरीप लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लसणाचे दर वाढल्यामुळे छोटे विक्रेते आपल्या दुकानात लसूण ठेवत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भुवनेश्वरच्या हंसपाल भागातील एका दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, १०० ग्रॅम लसणासाठी ५० रुपये मोजावे लागत असल्याचे ऐकून ग्राहक हैराण झाले आहेत. त्यामुळे तो लसणाचा साठा ठेवत नाही. भाव कमी झाल्यावरच दुकानात लसूण विक्रीसाठी आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओडिशात कापणीच्या वेळी लसणाचा भाव ४०० रुपये किलोवर पोहोचल्याचे दिसून आले आहे. मात्र, एवढी किंमत असूनही पीक उत्पादक शेतकऱ्याला फारसा नफा मिळत नसून मध्यस्थ व्यापारी त्याचा गैरफायदा घेत असल्याचे अहवाल सांगतात.

English Summary: Garlic Price Rs 400 per kg Why is the price of garlic increasing Garlic Proctiction
Published on: 05 February 2024, 11:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)