Brazil Soybean Production News : यंदाच्या हंगामात ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये २०२३-२४ मध्ये सोयाबीन उत्पादनात १५८.५ दशलक्ष टनाने खाली येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२२-२३ ऑक्टोबरमध्ये हा अंदाज १६१ दशलक्ष टन होता. त्यावर्षी हा अंदाज चालू हंगामाच्या ३ दशलक्ष टनाने जास्त होता, असं एफएएसने (FAS) ने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. तसंच ब्राझीलची अन्न एजन्सी कोनाबने देखील बुधवारी प्रकाशित केलेल्या मासिक अपडेटमध्ये आपल्या सोयाबीन उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केला आहे.
"उष्ण आणि कोरडे हवामान, जमिनीतील कमी ओलावा पातळी तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेला सरासरीपेक्षा कमी पाऊस यामुळे सोयाबीन उत्पन्नावर यंदा परिणाम झाला आहे. देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक प्रदेशांपैकी एक असलेल्या रिओ ग्रांदे डो सुलमध्ये गेल्या दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लागवडीचा वेग मंदावला. ज्यामुळे नुकत्याच लागवड केलेल्या बियांची योग्य वाढ झाली नाही, आणि पिकाला धोका निर्माण झाला", असं वृत्तही एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.
ऑक्टोबरच्या अंदाजानुसार पेरणी क्षेत्रात २ लाख हेक्टरची घट झाल्याचा अंदाज असूनही एफएएसने २०२२-२३ मध्ये सोयाबीनचे क्षेत्र ३ टक्क्यांनी वाढून ४४ दशलक्ष हेक्टरवर जाण्याचा अंदाज लावला आहे.
ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. मागील काही वर्षापासून हा देश उत्पादन आणि निर्यातीमध्ये युनायटेड स्टेट्सला मागे टाकत आहे. २०२३-२४ मध्ये ब्राझीलची युनायटेड स्टेटच्या तुलनेत एकूण निर्यात दुप्पट होण्याचा अंदाज आहे. तर सर्वात जास्त निर्यातही चीनला जाते तसेच चीन मोठा आयातदार देश आहे.
सोयाबीनचे उत्पादन कुठे कुठे होते
जगात सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन ब्राझीलमध्ये होते. त्यानंतर युनाटेट स्टेट, अर्जेटिना, चीन, भारत, पॅराग्वे, कॅनडा, रशिया, युक्रेन,बोलिव्हिया या १० देशात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. टॉप १० हे सोयाबीन उत्पादक देश म्हणून ओळखले जातात.
Published on: 11 January 2024, 02:59 IST