1. फलोत्पादन

डाळिंब भारतातील प्रमुख फळ पीक

KJ Maharashtra
KJ Maharashtra
डाळिंब भारतातील प्रमुख फळ पीक

डाळिंब भारतातील प्रमुख फळ पीक

डाळिंब हे भारतातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे.डाळींबाचे पीक हे भारतात महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान,उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरात, कर्नाटका इत्यादी राज्यात प्रामुख्याने घेतले जाते.डाळिंबाचे पीक लागावाडीनंतर 3 ते 4 वर्षानंतर फळ द्यायला सुरवात करते आणि डाळिंबाचे झाड हे 20 ते 25 वर्ष फळ देते. भारतात डाळिंबाचे क्षेत्र जवळपास 115हजार हेक्टियर आहे आणि उत्पादन जवळपास 750 हजार मेट्रिक टन आहे. भारतात वर्तमानमध्ये डाळिंबची शेती आणि उत्पादनक्षमता यात प्रचंड विस्तार होताना दिसतोय.

डाळिंबचे scientific नाव Punica granatum असे आहे. डाळिंबला इंग्लिशमध्ये pomegranate असे संबोधतात तर हिंदीत अनार असे संबोधले जाते.डाळिंब पौष्टिक गुणांनी परिपूर्ण, चविष्ट, रसदार आणि गोड फळ असते. डाळिंबाचा रस हा स्वास्थ्यवर्धक तसेच स्फ्रूतीदायक असतो.डाळिंबाच्या साळीपासून विविध प्रकारच्या पोटाच्या व्याधीचे औषध बनवले जातात. तसेच डाळिंबाचे दाणे वाळवून त्यापासून अनारदाना बनवतात जो की विविध व्यंज्यनात वापरला जातो. शेतकरी बांधव काही विशेष गोष्टींची काळजी घेऊन डाळिंब पिकातून चांगले प्रतीचे उत्पन्न घेऊ शकता

 डाळिंबसाठी लागणार हवामान

डाळींबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे. उन्‍हाळयातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्‍या वाढीस योग्‍य असते. अशा हवामानात चांगल्‍या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्‍या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुध्‍दा डाळिंबाचे उत्‍पन्‍न चांगले येते. फुले लागल्‍यापासून फळे होईपर्यंतच्‍या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्‍यास चांगल्‍या प्रकारची गोड फळे तयार होतात. कमी पावसाच्‍या प्रदेशात जेथे थोडीफार ओलीताची सोय आहे तेथे डाळींबाच्‍या लागवडीस भरपूर वाव आहे.

 डाळिंबसाठी उपयुक्त जमीन

डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेण्‍यात येते. अगदी निकस, निकृष्‍ठ जमिनीपासून भारी, मध्‍यम काळी व सुपीक जमिन डाळींबाच्‍या लागवडीसाठी चांगली असते, मात्र पाण्‍याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा पोयटयाची जमिन निवडल्‍यास उत्‍पन्‍न चांगले मिळते. त्‍याचप्रमाणे हलक्‍या, मुरमाड माळरान किंवा डोंगर उताराच्‍या जमिनीसुध्‍दा या पिकाला चालतात. मात्र जमिनीत पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक आहे. चुनखडी आणि थोडया विम्‍लतायुक्‍त (अल्‍कलाईन) जमिनीतही डाळिंबाचे पीक येऊ शकते.

 

डाळिंबाच्या जाती

गणेश – सध्‍या लागवडीखाली असलेले बहुतांश क्षेत्र हे या वाणाखाली असून हा वाण गणेशखिंड, फळसंशोधन केंद्र, पुणे या ठिकाणी डॉ. जी.एस.चीमा यांच्‍या प्रयत्‍नाने शोधून काढण्‍यात आलेला आहे. या वाणाचे वैशिष्‍टय असे की, बिया मऊ असून दाण्‍याचा रंग फिक्‍कट गुलाबी असतो फळात साखरेचे प्रमाणही चांगले आहे. व या वाणापासून उत्‍पादन चांगले मिळते.

 मस्‍कत – या जातीच्‍या फळाचा आकार मोठा असतो. फळांची साल फिक्‍कट हिरवी ते लाल रंगाची असून दाण पांढरट ते फिक्‍कट गुलाबी असतात. शेतक-यांनी रोपापासून बागा लावल्‍यामुळे झाडांच्‍या वाढीत व फळांच्‍या गुणधर्मात विविधता ाढळते. चवीस हा वाण चांगला असून उत्‍पादनही भरपूर येते. मृदुला, जी १३७, फुले आरक्‍ता, भगवा

 डाळिंब लागवडविषयी

डाळिंब लागवडिकरिता निवडलेली जमिन उन्‍हाळयामध्‍ये 2 ते 3 वेळेस उभी आडवी नांगरटी करुन कुळवून सपाट करावी. भारी जमिनीत 5 × 5 मिटर अंतरावर लागवड करावी.  त्‍यासाठी 60 × 60 × 60 सेमी आकाराचे खडडे घ्‍यावेत. प्रत्‍येक खडयाशी तळाशी वाळलेला पालापाचोळयाचा 15 ते 20 सेमी जाडीचा थर देऊन 20 ते 25 किलो शेणखत किंवा कंपोस्‍ट खत, 1 किलो सिंगल सुपरफॉस्‍फेट यांच्‍या मिश्रणाने जमिनी बरोबर भरुन घ्‍यावेत. सर्वसाधारणपणे पावसाळयात लागवड करावी. डाळिंबाची तयार केलेली कलमे प्रत्‍येक खडयात एक याप्रमाणे लागवड करावी.   कलमाच्‍या आधारासाठी शेजारी काठी पुरुन आधार द्यावा. कलम लावल्‍यानंतर त्‍याच बेताचे पाणी द्यावे. लागवडीनंतर सुरुवातीच्‍या काळात आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. 5×5 मीटर अंतराने प्रती हेक्‍टरी 400 झाडे लावावीत.

 खत व्यवस्थापन

पहिले वर्ष - नत्र, स्फूरद, पालाश -125:125:125 ग्राम

दुसरे वर्ष -नत्र, स्फूरद, पालाश -250:250:250 ग्राम

तिसरे वर्ष -नत्र, स्फूरद, पालाश

-500:250:250 ग्राम

चौथे वर्ष -नत्र, स्फूरद, पालाश

-500:250:250ग्राम

  • त्‍या शिवाय 5 वर्षानंतर झाडाच्‍या वाढीनुसार प्रत्‍येक झाडास 10 ते 50 किलो शेणखत आणि 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्‍फूरद व 250 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे.

 पाणी व्यवस्थापन

डाळींब पिकास फुले येण्‍यास सुरुवात झााल्‍यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्‍या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्‍वाचे आहे. पाणी देण्‍यात अनियमितपणा झाल्‍यास फुलांची गळ होण्‍याची शक्‍यता असते. फळांची वाढ होत असतांना पाण्‍याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्‍यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी न पिकलेली फळे गळतात. पावसाळयात पाऊस न पडल्‍यास जरुरीप्रमाणे पाणी द्यावे व पुढे फळे निघेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने पाण्‍याची पाळी द्यावी. फळाची तोडणी संपल्‍यानंतर बागांचे पाणी तोडावे.

 

डाळिंबाचा बहार कधी

 डाळींबाच्‍या झाडास तीन बहार येतात. आंबिया बहार. मृग बहार, हस्‍तबहार यापैकी कोणत्‍याही एका बहाराची फळे घेणे फायदेशिर असते. आंबियाबहार धरणे अधिक चांगले कारण फळांची वाढ होताना व फळे तयार होताना हवा उष्‍ण व कोरडी राहते. त्‍यामुळे फळास गोडी येते. फळांवर किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पाण्‍याची कमतरता असल्‍यास मृगबहार धरावा.

1.आंबीया बहार -जानेवारी फेब्रुवारी महिन्यात असतो व फळ येण्याचा कालावधी जून ते ऑगष्ट या दरम्यान असतो.

2.मृग बहार - मृग बहार जून ते जुलै ह्या दरम्यान असतो व फळ येण्याचा कालावधी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान असतो.

3.हस्त बहार - सप्टेंबर ते ऑक्टोबर या वेळेत हस्त बहार असतो ह्या बहाराची फळे येण्याचा कालावधी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान असतो.

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters