1. फलोत्पादन

असे करा आवळा बागेचे पावसाळ्यात खत आणि पाणी व्यवस्थापन, होईल फायदा

KJ Maharashtra
KJ Maharashtra
management of goosberry

management of goosberry

 आपल्याला माहिती आहे की आवळा फळ पिकात उन्हाळ्यात फळधारणा होते. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत ती सुप्तावस्थेत असतात. जेव्हा पावसाचे आगमन होते त्यानंतर फळे वाढण्यास सुरुवात होते. त्यानंतर मात्र बागेची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते.पावसाळ्यामध्ये आवळा या फळात पिकामध्ये खत व्यवस्थापन, छाटणी फुले व फळगळ नियंत्रण आदी बाबी फार महत्त्वाच्या असतात. या लेखात आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

 आवळा  फळपिकाच्या झाडाला वळण देणे आणि त्याची छाटणी

 आवळा चे चांगले उत्पादन यावे यासाठी झाडाला योग्य आकार देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आवळ्याच्या झाडाचे लाकूड हे अतिशय ठिसूळ असते. त्यामुळे फळांच्या वजनाने आवळ्याच्या फांद्या  मोडू  शकतात. त्यामुळे झाडाचा योग्य सांगाडा तयार होणे अतिशय महत्त्वाचे असते. झाडाला योग्य आकार देण्यासाठी लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून झाडास वळण देणे आवश्‍यक असते. त्यासाठी प्रथम जमिनीपासून 75 ते 100 सेंटीमीटर उंचीपर्यंत सरळ एक मुख्य खोड वाढवून घ्यावे. नंतर त्या पुढे पाच ते सहा  फांद्या चहुबाजूंनी वाढू द्यावे. चांगला सांगाडा तयार व्हावा यासाठी झाडावर  आलेल्या इतर फांद्यांची छाटणी करावी. खोडावर एक मीटर खाली येणारी फूट सुद्धा काढून टाकावी. पावसाळा संपल्यावर रोगट, कमजोर आणि वेड्यावाकड्या फांद्या काढून टाकावे. मात्र दरवर्षी फळे देणाऱ्या झाडांची छाटणी करणे आवश्यक नाही.

 आवळ्याचे फुल आणि फळधारणा

 आवळ्यामध्ये डिसेंबर जानेवारी महिन्यात पानगळ होते. त्यानंतर पुढच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात नवीन पालवी आणि फुले येतात. आठ ते पंधरा दिवसांमध्ये फळधारणा होते. फळधारणेनंतर जवळपास तीस दिवस फळे सुप्तावस्थेत जातात. पावसाच्या आगमनाबरोबर फळांच्या वाढीस सुरुवात होते व फळांचे चांगली वाढ व्हावी यासाठी त्याला खत मात्रा द्यावी.

 फुल आणि फळगळ  नियंत्रण कसे करावे?

 आवळा झाडाची फूल व फळगळ ही तीन अवस्थांमध्ये होते. पहिली फुलांची गळ ही फुलोरा पासून तीन आठवड्यात होते. यामध्ये जवळपास 70 टक्के फुले गळतात. परागीकरणाच्या अभावामुळे ही गळ होते.लागवड करतानाच वेगवेगळ्या जातींची लागवड केल्याने ही समस्या टाळता येते. त्यानंतर दुसरी फळी गळ जून ते सप्टेंबर या काळात बीजांड धारणे अभावी होते. त्यासाठी बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची दहा मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी केल्याने ही फळगळ रोखता येते. तिसरी फळगळ ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होते. विविध अवस्थेतील फळे या काळात गळतात. फळधारणेच्या काळात जिब्रेलिक आमला ची फवारणी केली असता फळांच्या आकारमानात वाढ होते.

 

 आवळा फळ पिकाचे पाणी व्यवस्थापन

 आवळ्याची लागवड कोरडवाहू पीक म्हणून केली जाते. मात्र नवीन झाडांना कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार 20 ते 30 लिटर पाणी प्रति झाड 10 ते 15 दिवसांच्या अंतराने द्यावे. आवळ्याची पूर्ण वाढ झालेली झाडे पाणी न देता हे चांगली फळे देतात. मात्र फळे देणार या झाडांना वीस दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे त्यामुळे फळगळ कमी होते. तसेच फळांची वाढ चांगली होते. आवळा फळपिकाच्या झाडाला सिंचनासाठी झाडाच्या पसार्‍याचा प्रमाणात पाच टक्के बाहेर आत झाडाच्या खोडाच्या दिशेने उतार असलेले गोलाकार आळे बांधावे. उपलब्ध आच्छादनाचा व त्यात वापर केल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जाते. जमिनीत जास्त दिवस ओलावा टिकून राहील याचा वयाचे भरीव उत्पादन मिळते.

 आवळा फळपिकाच्या जुन्या बागेचे नूतनीकरण कसे करावे?

 जुनी निकृष्ट दर्जाची आणि जंगली आवळ्याची झाडे चांगल्या जातीच्या झाडात बदलता येतात. त्यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात जुन्या झाडाची एक मीटर उंचीवर छाटणी केलेली असावी. छाटणी केल्यानंतर काही दिवस झाडे सुप्तावस्थेत गेलेली असतात. साधारणपणे एका महिन्यानंतर छाटणी केलेल्या झाडावर अनेक फुटवे आलेले असतात. जुलै-ऑगस्ट महिन्यात त्या फुटव्यांवर डोळे भरावेत. मात्र डोळे भरताना केवळ सशक्त फुटवे ठेवून त्यावरच चांगल्या जातीचे डोळे भरावे. अशा प्रकारे संपूर्ण झाड नवीन आणि चांगल्या जातीचे होऊ शकते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters