1. फलोत्पादन

कसे कराल सिताफळ बागेचे बहार व्यवस्थापन

KJ Maharashtra
KJ Maharashtra
custord apple

custord apple

 बहार धरणे म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आणि तिच्या मगदुरानुसार बागेचे पाणी बंद करून बागेला ताण देणे, बागेची छाटणी व मशागत करून नंतर पाणी व खते देणे याला  म्हणतात. उन्हाळी बागेचे व्यवस्थापन करताना बहार घेण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी बंद करणे आवश्यक ठरते. जमिनीत 40 ते 45 दिवस बागेचे पाणी बंद करावे. या मधल्या काळात जुनी पाणी पूर्णपणे गळून गेलेली असतात आणि नवीन पाने येण्याचा काळ असतो तेव्हा बागेची छाटणी करून घ्यावी. त्यालाच आपण झाडाला विश्रांती देणे असेही म्हणतो.

 झाडाला आकार देण्यासाठी असतात पहिली दोन वर्षे महत्त्वाची

सिताफळ लागवडी मध्ये झाडांना आकार देणे महत्त्वाचे असते. सीताफळाची रोपे लावल्यानंतर दीड ते दोन फुटापर्यंत एकच खोड ठेवावे. नंतर प्रत्येक दीड ते दोन फुटावर तिचा शेंडा मारून एका फुटीच्या 2, दोन फुटी चार खांद्या अशाप्रकारे फुटींची संख्या वाढवून झाड  डेरेदार वाढवावे. सिंगल फूट दोन फुटाचे पुढे जाणार नाही याची सतत दोन वर्षे काळजी घ्यावी.

 सीताफळाच्या झाडाला आधार देणे

 सुरुवातीला झाडाच्या अवस्थेत त्यालाव्यवस्थित आकार देणे फार महत्त्वाचे असते. जेव्हा आपण सीताफळाची लागवड करतो देवास सीताफळाचे रूपाला बांबूच्या काठीचा आधार देऊन खोड बांधून घ्यावे. खोड  बांबूला निबंधात असताना प्लास्टिकचा रुंद पट्टीने बांधावे. जेणेकरून खोडामध्ये बांधलेली दोरी रुतणार नाही. जर आपण सुरुवातीला खिवड सरळ राहील याची काळजी घेतली नाही तर नित्य मान्सून वाऱ्यांमुळे खोड ईशान्य  बाजूला दुखते आणि दक्षिणायन चालू असताना 90 अंशांच्या कोनामध्ये सूर्याची किरण जास्त वेळराहिल्यामुळे खोडावरील साल जळते.त्यामुळेखोड सरळ असणे आवश्यक असते.

 सीताफळ बागेची बहार छाटणी

 सीताफळाच्या झाडाची वाढ नियंत्रित व उत्तम गुणवत्तेची फळे मिळवण्यासाठी दोन वर्षानंतर बहाराची  छाटणी करणे गरजेचे असते. बहार छाटणी करताना खोडावरील दोन फुटापर्यंत फुटी आणि वॉटर शूट काढावे. वाळलेल्या रोगट, दाटी करणाऱ्या फांद्यांचा शेंडा मारावा, बारीक फांद्या काढाव्यात, फुले आल्यानंतर येणारी नवीन फूट काढावी जेणेकरून झाडाच्या मधल्या भागात सूर्यप्रकाश मिळेल. सीताफळाच्या झाडाला जोरकस वारा असेल तर प्रत्येक दीड ते दोन फूटला फुटीचा शेंडा मारावा. ही क्रिया आपोआप फूट थांबेपर्यंत करत राहावे.

त्यामुळे सिताफळाचे झाड डेरेदार होते व पसरते. फळांची संख्या चांगली मिळून फळांची वाढ चांगली होते. छाटणी करताना पेन्सिल आकारापेक्षा मोठ्या काड्या काढल्यास फळांची संख्या कमी मिळते. मात्र फळांचा आकार त्यामानाने मोठा मिळतो. तर पेन्सिल आकारापेक्षा लहान कड्या ठेवल्यास फळांची संख्या त्या मानाने जास्त मिळते मात्र फळांचा आकार लहान राहतो.

 बागेला पाण्याचा ताण देणे

 सीताफळ लागवडीत पाणी व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सीताफळाच्या बागेला पानगळीच्या काळात पाणी पूर्ण बंद करावे. जातीनुसार पानगळीचा काळ कमी अधिक असतो. झाडाला परिपूर्ण विश्रांती देणे गरजेचे असते. विश्रांतीच्या काळात छाटणी व मशागत व आकार देणे ही कामे करून घ्यावी. असे केल्यास झाडाला भरपूर फुलधारणा होते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters