Health

कोरोनाला पराभूत करायचे असेल तर आपल्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती असणे गरजेचे आहे. आणि ही इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. दरम्यान आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात संसर्गजन्य आजार म्हणजेच ताप, सर्दी, खोकला आदींची साथ मोठी पसरत असते.

Updated on 04 November, 2020 2:39 PM IST


कोरोनाला पराभूत करायचे असेल तर आपल्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती असणे गरजेचे आहे आणि  ही इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे.दरम्यान आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत.या दिवसात संसर्गजन्य आजार म्हणजेच ताप, सर्दी, खोकला आदींची साथ मोठी पसरत असते. यामुळे कोरोनाचा आजारचा पैलाव होऊ शकतो.यामुळे आपल्याला इम्युनिटी वाढवण्याची गरज आहे.दरम्यान इंफेक्शन किंवा संसर्ग होऊ नये यासाठी अनेकजण यावेळी काढा, ज्यूस किंवा ग्रीन टीचे सेवन करत आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का ? या काळात काही अशी फळे आहेत जी तुमची इम्युनिटी वाढविण्यास मदत करतील. आज आपण या लेखात अशाच काही फळांची माहिती घेणार आहोत...

पेरू - थंडीच्या काळात पेरू  या फळाला खूप मागणी असते. पेरूमध्ये व्हिटॉमीन सी आणि अॅण्टी ऑक्सीडेंट हे घटक अधिक असतात. हे घटक संसर्ग न होऊ देण्यासाठी उपयोगी आहेत. यासह पेरूमध्ये फायबरची मात्रा अधिक असते, यामुळे ब्लड शुगरसाठी चांगले असते.

नाशपाती  - थंडीच्या काळात नाशपाती नावाच्या  फळाला  खूप मागणी असते.  खाण्यासह नाशपातीचे ज्यूस पण चवीला चांगले असते. नाशपातीमध्ये व्हिटॉमीन ई आणि सी सारखे  अॅण्टी ऑक्सीडेंट आणि अॅण्टी इंफ्लेमेटरीचे गुण ही यात आहेत. 

 

संत्रा - संत्रामध्ये व्हिटॉमीन सी आणि कॅल्शिअमसाठी खूप चांगले आहे. साथीच्या आजारापासून वाचविण्यासाठी संत्रा खूप चांगले आहे. आपल्याला शरिराला आतून चांगले बनवते.जर तुम्हाला संत्रा आवडत असेल तर तुम्ही ज्यूसही पिऊ शकतात.

सफरचंद  - हे फळ आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. शरिरारातील  आजार दूर ठेवण्यास फायदेकारक आहेत. आपल्या शरिरातील इम्युनिटी वाढविण्यास मदत करतो. सफरचंदात फायबर, व्हिटॉमीन सी, आणि क हे घटक असतात.

 


मोसंबी – मोसंबी एक आंबट असणारे फळ आहे. यात व्हिटॉमीन सी हे भरपूर प्रमाणात असते. याचे ज्यूसही आपण पिऊ शकतो.

डाळिंब  - डाळिंब हे प्रत्येकांना माहिती असणारे फळ आहे. लाल रंगाचे असणारे फळ खाण्यास गोड असते. रक्त पातळ करण्याचे काम डाळिंब करत असते. याशिवाय रक्तदाब, हृदय, वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेकारक  असणारे आहे.

प्लम – हे अण्टी ऑक्सीडेंटचं हे मुख्य स्रोत आहे. पल्म हे कॅन्सर विरोधात लढण्याची ताकद देत असते.

English Summary: You will not get sick, you will eat these seven fruits, your immunity will increase
Published on: 04 November 2020, 02:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)