तुळशीच्या पानात अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांचे रोज सेवन केले तर तुम्हाला शारीरिक समस्या उदभवणार नाहीत. तुळशीमुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. जर तुम्हाला हवामानातील बदलांमुळे संसर्ग टाळायचा असेल तर दररोज हळद आणि तुळशीचा रस प्यावा. जर तुम्हाला सर्दी किंवा घसा खवखव करण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही तुळशीच्या पानाचा रस पिणे गरजेचे आहे यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम भेटेल.
१. तुळशीची दोन ते तीन पाने रोज खाल्याने ऍसिडिटी मध्ये सुद्धा आराम भेटतो. जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटी होत असेल तर जेवणानंतर पाने तुळशीची पाने खावावी. पोटदुखीचा त्रास होत असल्यास नारळ पाण्यात तुळस आणि लिंबाचा रस मिसळून प्या जे की यामुळे तुमची पोटदुखी देखील कमी होईल आणि तुमच्या पोटास आराम भेटेल.
२. सकाळची सुरुवात चहाने होत असेल तर त्यात तुळशीची काही पाने आल्याबरोबर टाका. तुळशीची पाने खाल्याने पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळते तसेच ऋतू बदलामुळे होणाऱ्या संसर्गामध्ये आराम मिळतो. जे की काही वेळा पावसाळा चालू झाला की खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन होते ज्यामुळे मोठ्या प्रमाणत लोक आजारी पडतात. जे की यावेळी तुम्ही जर तुळशी पाने जर खात असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन होणार नाही.
हेही वाचा:-हजारो आजरांवर आहे हे गुणकारी फळ, फायदे वाचून विश्वास बसणार नाही.
३. तुळशीचे पाणी पिल्याने सर्दी आणि घसा खवखवल्यास लवकर आराम मिळतो. तसेच ज्या लोकांना मधुमेहासारखा आजार आहे त्यांना तुळशीचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दररोज तुळशीची पाने खाल्याने विषारी द्रव्य बाहेर पडतात व रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत बनते. तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्याही दूर होतात. बद्धकोष्ठता आणि लूज मोशनच्या समस्येपासूनही आराम मिळतो. याशिवाय पोटही चांगले राहते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने आपल्या शरीराच्या तापमानात फरक पडतो तसेच व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव होतो.
हेही वाचा:-शेतकरी बांधवांनी वाढणार डोकेदुखी, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा, वाचा सविस्तर
४. तुळशी कॅन्सर या रोगावरती सुद्धा खूप गुणकारक आहे जे की तुम्ही रोज तुळशीची पाने खाल्ली तर तुम्हाला कॅन्सर होत नाही. जे की रोज सकाळी उपाशी पोटी तुम्ही ३-४ तुळशीची पाने खावी याचा फायदा तुमच्या शरीराला आहे आणि कॅन्सर पासून तुमचे सरंक्षण होऊ शकते.
Published on: 29 September 2022, 04:22 IST