Health

शरीर माध्यम खलु धर्म साध्यनम विजय संस्कृत पंक्ती आहे ही अतिशय महत्त्वाची आणि अर्थपूर्ण आहे. कोणतेही सत्कार्य साधायच्या झालं तर त्यासाठी मजबूत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती मनाला समाधानकारक मिळणे दुरापास्त असते. त्याच बरोबर स्वस्थ शरीरात स्वस्थ मन वसते. म्हणुनच म्हणतात ना मनाचे स्वास्थ्य हे शरीराच्या स्वास्थ्यवर अवलंबून असते.

Updated on 21 June, 2021 12:15 PM IST

शरीर माध्यम खलु धर्म साध्यनम विजय संस्कृत पंक्ती आहे ही अतिशय महत्त्वाची आणि अर्थपूर्ण आहे. कोणतेही सत्कार्य साधायच्या झालं तर त्यासाठी मजबूत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती मनाला समाधानकारक मिळणे दुरापास्त असते. त्याच बरोबर स्वस्थ शरीरात  स्वस्थ मन वसते. म्हणुनच म्हणतात ना मनाचे स्वास्थ्य हे शरीराच्या स्वास्थ्यवर अवलंबून असते.

 मनाचा योग कसा साधला जातो हे विनोबाजी अतिशय सुंदर पद्धतीने लिहितात. ते लिहितात की, खाटेवर रुग्ण दुःखीकष्टी आहे, नर्सची ड्युटी संपलेली आहे. त्याच्या संपुर्ण व्यथा व औषध द्यायचे तिला सातत्याने आकलन आहे. परंतु तिची घरी जायची वेळ झाली  म्हणून ती घड्याळाकडे पाहून निघून जाणार व दुसरी रुजू होणार. तो अत्यवस्थ रुग्ण पाहून तिने सेवाभावी ने दिलेला अधिकचा वेळ या अंतर्गत सेवेची पोचपावतीच नाही का? यालाच भगवद्गीतेत  कर, अकर  आणि विकार योगालवकर आणि विकर योग असे म्हटले जाते. जर आपण आतून स्वतःचे समरस झालो स्वतःला जोडून घेतले  तर मग मनाला हवी असलेली मानसिक शांती कुठे बाहेर शोधावी लागत नाही. योगात अष्टांग मार्ग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी यांना प्राधान्य दिले गेले आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य साठी जीवनात उठणे बसण्याचे व खाण्यापिण्याचे नियम घालून घ्यावे लागतात. अन्यथा एकांगी  स्वरूपाचेकार्य व विचार होईल. भगवत गीतेत म्हटले आहे की योगावरी चढू जाता शम साद्येनं बोलीले. शमा चा अर्थ सय्यम न फार खाऊनी  किंवा खाण्याची सोडूनी किंवा खाण्याची सोडूनी निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्य ही मोजूनी  करतो  त्यास योग हा दुःखनाशन अर्जुनाला दिलेला उपदेश सर्वांसाठी योग प्रेरक आहे.

 एकदा का आपण स्वतःला साधारण सुलभ चाकोरीत बसवून घेतलं की योगाला पूरक अशी एकूण शरीर-मनाची पार्श्वभूमी तयार होते. अर्थात तुम्ही कुठे राहता ते घर-अंगण, परिसर, मित्र काया वाचा, पूजा विधि  पद्धती, चिंतन मनाचे तुमचे विषय शरीरातील किती वेळ देतात? जेवणासाठी, झोपण्यासाठी वेळ देतोच. व्यायाम योगासन प्राणायाम याला योग्य वेळ देणे गरजेचे आहे. योग  साधक तसे करणार नाही. त्याला सम्यक आहार, सम्यक विहाराची चाड लागलेली असावी. त्याला आरोग्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही.. तो  सकाळ, संध्याकाळ योगासाठी वेळ काढणार. नियंत्रित आसन व प्राणायाम करणार  योग म्हणजे जोडणे हा विचार तो आपल्या जीवनात घेऊन निघाला की त्याला निसर्गाशी व नैसर्गिक सहज योगा शी तो आपले सूत्र जोडण्याचा प्रयत्न करतो.  कारण योग हा दुःख नाशक निसर्गाच्या नियमाप्रमाणे जोडत राहिल्याने उलटे विचार, आचार आणि उच्चार होण्याचे कारण नाही.

जीवनात सर्वांच्या हिताचे समदृष्टी यायला लागते. सर्वांना सुख लाभावे तशी  आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये हे सर्वात्मक निरामय आरोग्याचे भावना घेऊन तो धारणेवर चढतो. कुठलीही हानी कारक, हिंसक, असत्य गोष्ट तो टाळतो. तशी योगाची वृत्ती ही प्राणायाम आणि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरी जाऊन आसने प्राणायाम करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण आपल्या जीवनशैलीशी निगडीत झालेला विषय आहे.

 निसर्गात चैतन्य शक्ती काम करते व हे जीवन सहज जीवन आहे. यात वाटा संपूर्ण सजीवसृष्टी चैतन्याचा आहे. जिओ जीवस्य जीवनम् असे हे परस्परावलंबी जीवन आहे. व्यक्ती ते समष्टी  चा प्रवास हा परस्परांना एका अ दृश्य साखळीत बांधतो. सत्यम शिवम सुंदरम असं  मंगलमय जीवन एकमेका साहाय्य करून जगणे सुसह्य केले गेले पाहिजे. योगाच्या माध्यमातून जीवन सुयोग्य होईल. आत्मा मोक्षर्थ जगत हितायच असा वसुधैव कुटुम्बकम धागा जुळावा.

English Summary: yoga and health
Published on: 21 June 2021, 12:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)