Health

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

Updated on 22 March, 2022 5:01 PM IST

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.

ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. 

साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया .

१) ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी १० ते दुपारी 5 आहे. आयुर्वेदानुसार ताक व भाकरी हा सर्व जीवन सत्व प्रदान करणारा परिपूर्ण आहार आहे. जुन्या काळात ताकात भिजवलेली भाकरी सोबत घेऊन प्रवासात सलग दोन तीन दिवस खायचे.ताक प्यायल्याने शरीराची वाढलेलीचरबी घटण्यास मदत होते.

२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात शेंदेमीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

३) ताक नेहमी ताजे प्यावे, शिळे नको. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

४) ताक संपूर्ण शरीराला थंड ठेवते. (आईस्क्रीम कोल्ड ड्रिंकस शरीराला १००% अपायकारक आहेतच, पण ते पिताना गार वाटतात पण मग शरीरात थंडावा निर्माण न करता शरीराची उष्णता वाढवतात ) उन्हाळ्यात घराबाहेर जाण्या अगोदर किंवा दुपारी ताक पिल्यास उन्हाळी लागत नाही. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. जेवायच्या अर्धा तास अगोदर ताक पिल्यास भूक वाढते जेवना नंतर पिल्यास अन्न घटकांचे पचन होते

८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

१०)महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.

तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.चला तर मग ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks एनर्जी ड्रिंकस ऐवजी ताक पियूया.

English Summary: Yes stare means for we amrut know about in detail
Published on: 22 March 2022, 05:00 IST