Health

भारतात गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश राज्यात डाळिंब लागवड वाढत आहे.

Updated on 08 March, 2022 12:34 PM IST

भारतात गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश राज्यात डाळिंब लागवड वाढत आहे. भारतात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. डाळिंब हे फळ अतिशय पौष्टिक मानले जाते. डाळिंब फळात लोह, प्रथिने. कर्बोदके, तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. डाळिंबाचा उपयोग औषधी म्हणून देखील होतो. डाळिंब फळाची साल औषधी म्हणून वापरली जाते. अनेक आजारांवर डाळिंब अत्यंत उपयोगी ठरते. जाणून घेऊयात डाळिंबाचे फायदे कोणते आहेत.

डाळिंबाचे फायदे –

१. डाळिंब हे पित्तनाशक म्हणून ओळखले जाते.

२. डाळिंब रसाचे सेवन केल्यास भूक वाढते व पचन क्रिया सुधारते.

३. डाळिंब हृदयास अत्यंत फायद्याचे ठरते.

४. खडीसाखरेबरोबर डाळिंबाचे सेवन केल्यास पोटातील जळजळ , आंबट ढेकर कमी होते.

५. दीर्घ उपवासात हे फळ अत्यंत उपयुक्त ठरते.

६. उच्च रक्त दाबाचा त्रास होत असले तर डाळिंब त्यावर फायदेशीर ठरते.

७. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी डाळिंब मदत करते.

८. पोटात गॅस होत असेल तर त्यावर डाळिंब उपयुक्त ठरते.

९. डाळिंबामुळे रक्तभिसरण क्रिया सुधारते.

१०. खूप दिवसापासून खोकला असल्यास डाळिंबामुळे तो बरा होण्यास मदत होते.

डाळिंबाचे असे अनेक फायदे आहेत. परंतु डाळिंबाचे दाणे काढल्यानंतर लगेच खावेत. जास्त काळ काढून ठेवल्यास त्यातील पोषक द्रव्ये कमी होतात.

डाळिंबाचा उपयोग औषधी म्हणून देखील होतो. डाळिंब फळाची साल औषधी म्हणून वापरली जाते. अनेक आजारांवर डाळिंब अत्यंत उपयोगी ठरते. जाणून घेऊयात डाळिंबाचे फायदे कोणते आहेत.

English Summary: Yes Pomogranate is in cure some disease limit
Published on: 08 March 2022, 12:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)