Health

जास्त प्रमाणात मद्यपान करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन टाळले पाहिजे.

Updated on 03 May, 2022 9:27 AM IST

जास्त प्रमाणात मद्यपान करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन टाळले पाहिजे. दारूचे व्यसन खूप वाईट आहे जे सहजासहजी सोडले जात नाही. जर तुम्हाला ते सोडायचे असेल तर तुम्हाला दारू सोडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय मदत करू शकतील..

कारल्याचा रस

              कारल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे निरोगी राहण्यासाठी फायदेशीर मानले जातात. कारली चवीला कडू लागु शकते पण कारल्याच्या रसाचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिटॅमिन ए, बी, सी आणि खनिजे - कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे, पोटॅशियम सर्वात जास्त कारल्यात आढळतात. अल्कोहोलचे व्यसन सोडण्यासाठी कारल्याचा रस नियमित सेवन करावा. हे केवळ दारूचे व्यसन सोडण्यास मदत करत नाही तर आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ताक घालून त्याची चव सुधारू शकता.

दारू सोडण्यासाठी द्राक्षे

                  द्राक्ष हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे, त्यात भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. द्राक्षे खाण्याचे फायदे खूप आहेत कारण द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, के, सी तसेच व्हिटॅमिन बी 6 देखील आढळतात. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियमसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

हे ही वाचा - मधुमेहाचे आयुर्वेदिक औषध शोधताय तर अगोदर मधुमेह काय ते समजून घ्या

जर तुम्हाला मद्यपान सोडायचे असेल तर द्राक्षे तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. यासाठी वाइनऐवजी साधारण महिनाभर द्राक्षांचे सेवन करावे. कारण द्राक्षापासून वाईन देखील बनवली जाते, त्यामुळे द्राक्षांचे सेवन केल्याने तुम्ही दारूच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता.

आजवाइन(ओआ) पाणी-

              अजवाइन हा एक खास मसाला आहे ज्यामध्ये आनंददायी सुगंध असलेली पाने आणि कडक मसालेदार चव आहे. अजवाईच्या बियांमध्ये अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. त्यात काही प्रथिने, चरबी आणि कर्बोदके देखील असतात. दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अजवायनचे पाणी देखील वापरू शकता. यासाठी महिनाभर रोज अजवाईचे पाणी बनवून प्यावे. तुम्ही लवकरच दारूच्या व्यसनापासून मुक्त व्हाल.

 अश्वगंधा-

             अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाणारी एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. दारू पिण्याच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची असेल तर आयुर्वेदिक औषधात अश्वगंधा वापर करू शकता. हे दारूच्या व्यसनावर मात करण्यास मदत करते. उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की अश्वगंधाच्या सेवनाने दारू पिण्याची इच्छा कमी होते.

 दारू सोडवण्यासाठी सर्वउत्तम उपाय म्हणजे योग – 

                 योगासने करून तुम्ही सहज दारूच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता, हा एक चांगला उपाय आहे. कोणतीही व्यक्ती जेव्हा जास्त तणावात असते तेव्हा जास्त दारू पितात. मानसिक तणाव दूर करण्यासाठी लोक दारूचा अवलंब करतात. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे काही काळ नियमितपणे योगासने करा. योग- प्राणायाम तुमचे मन शांत करून दारूच्या व्यसनावर मात करण्यास मदत करते.

 आपल्याला इतर काही शारीरिक तक्रारी असतील तर अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 Nutritionist & Dietitian

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 721833221

English Summary: Wow these are Ayurvedic remedies for alcoholism
Published on: 03 May 2022, 09:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)