मुंबई- बदलती जीवनशैली व सकस आहाराच्या अभावामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अगदी तिशीतल्या तरुणालाही हृदयविकाराच्या घटनांना सामारे जावे लागत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानाचे वाढते प्रमाण, व्यायामाचा अभाव ही तरुणांमध्ये हृदयविकार वाढण्याती प्रमुख कारणे आहेत.
जाणून घेऊया हृदयविकाराची कारणे व त्यावरील उपाय:-
आकडे बोलतात:
भारतामध्ये शहरी भागात होणा़या एकूण मृत्युमध्ये 25 टक्के मृत्युस हृदयरोग कारणभूत आहे. भारतात दरवर्षी १.५ दशलक्ष व्य्क्ती हृदयरोगामुळे मृत्यमुखी पडतात. मागील चार दशकापासून भारतातील हृदयरोगाचे प्रमाण ग्रामीण भागात दुपट्टीने तर शहरी भागात सहा पटीने वाढलेले आहे.
हदयरोगाची कारणे:
धुम्रपान - धुम्रपान हे 25 टक्के हदयरोगाने मृत्युमुखी पडण्याास कारणीभुत ठरते. हृदयरोग होण्योचा धोका हा रोज ओढण्याात येणाऱ्या सिगारेट किंवा बीडी यांच्या संख्येशी समप्रमाणत असतो. धुम्रपान बंद केले तरीही अशा व्यक्तीेमध्ये हृदयरोग होण्याचा धोका हा किमान १० वर्षतरी धुम्रपान न करणा़या व्यक्तीपेक्षा जास्त असतो.
धुम्रपान बंद करणे –
आपले ध्येय हे धुम्रपान रहित समाज तयार करण्यारचे असावे.
३. रक्तदाब नियंत्रित करणे-
नियमितपणे आपला रक्तदाब तपासून घेणे व रक्तदाब वाढला असल्यास त्या वर नियमितपणे डॉक्टरांच्या मार्गदर्शना खाली उपचार घेणे.
४. नियमित व्यायाम करणे व स्थूवलपणा हाऊ न देण्याची खबरदारी घेणे
५. मद्यपान बंद करणे
अशा विविध प्रतिबंधात्माक उपाय योजनांनी वा जीवनशैलीतील बदलांनी हृदयरोग होण्यापासून प्रतिबंध घालता येतो.
Published on: 29 September 2021, 11:07 IST